Crime sakal
पुणे

Pune Crime : दाजीने दिली मेव्हण्याला मारण्याची सुपारी; सुपारी घेणारे अटकेत

कौटुंबिक वादातून दाजीने दोन मध्यप्रदेशमधील पैलवानांना सुपारी देवून मेव्हण्याचा खून करण्यास सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कौटुंबिक वादातून दाजीने दोन मध्यप्रदेशमधील पैलवानांना सुपारी देवून मेव्हण्याचा खून करण्यास सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात ३१ वर्षीय मेव्हणा गंभीर जखमी झाला आहे.

अश्विनीकुमार शेषराव पाटील (वय ५२, रा. कमलनिवास, संतोष बेकरीजवळ, आपटे रस्ता) असे सुपारी देणाऱ्या दाजीचे नाव आहे. त्याने महेश महादेव ठोंबरे (वय २८, रा. जुना बस स्टॉप संगमवाडी) आणि फैजल खान (रा. मध्य प्रदेश) आणि आणखी दोघांना खून करण्याची सुपारी दिली होती. याबाबत ३१ वर्षीय मेव्हणाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी आपले हॉटेल बंद करून घरी जात होते. त्यावेळी दोघांनी पत्ता विचारण्याचा बहाण्याने त्यांच्या तोंडावर मिरची टाकली व हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एकमधील पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, नीलेश साबळे करत होते. त्यांनी घटनास्थळापासून विविध ठिकाणी जाणाऱ्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज पाहून संशयित आरोपी ठोंबरे याला ताब्यात घेण्यात आले.

त्याकडे तपास केला असता त्यांना फिर्यादी यांच्या दाजीच्या सांगण्यावरून ५० हजार रुपायांची सुपारी देवून फैजल खान आणि त्यांच्या दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे सांगितले. ठोंबरे याने दिलेल्या माहितीच्या आधारे पाटील याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ठोंबरे आणि फैजल खान यांनी पाटील यांच्या सांगण्यावरून पूर्व नियोजित कट रचून हा गुन्हा केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलिस उप-आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे-१) सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलिस अंमलदार दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, शुभम देसाई, नीलेश साबळे, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, अय्याज दड्डीकर, अभिनव लडकत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Open: लक्ष्य सेन, पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीवर लक्ष; थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून; आयुष शेट्टीकडूनही अपेक्षा

Latest Marathi News Live Update : लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे ३ हजार याच आठवड्यात मिळण्याची शक्यता

IPL च्या कारणाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; पाकिस्तान, बांगलादेश दौऱ्यासाठी कमिन्ससह 'या' प्रमुख खेळाडूंची निवड नाही

NCPच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत पार्थ आणि जय पवार; तर प्रफुल्ल पटेलांना वगळलं, सुनेत्रा पवारांनी दिलं स्पष्टीकरण

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये स्थळ पाहणीला सुरुवात, आमदार शिवाजी पाटलांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT