crime file against pune rooftop hotel pcmc warning conduct new survey for it Sakal
पुणे

Pune News : पुण्यातील ‘रूफ टॉप हॉटेल’वर गुन्हा दाखल होणार; महापालिकेचा इशारा

पुणे महापालिका नव्याने सर्वेक्षण करणार; आयुक्तांकडून गंभीर दखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वारंवार कारवाई करूनदेखील पुन्हा सुरू होणाऱ्या रूफ टॉप हॉटेलवर आता थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे. तसेच अशा हॉटेलचे नव्याने सर्वेक्षण करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागांतील इमारतींच्या टेरेसवर असलेले बार व हॉटेल (रूफ टॉप) पहाटे उशिरापर्यंत सुरू राहतात. त्याचा लगतच्या इमारतींमधील रहिवाशांना मोठा त्रास होतो. त्याचबरोबर आगीसारखी घटना घडल्यास जीवितहानी होऊ शकते.

या प्रकाराची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केली आहे.

यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर रूफ टॉप हॉटेल सुरू असल्याचे उघड झाले होते. महापालिकेने त्यांना परवानगी दिली नसल्याचेही उघड झाले होते. महापालिकेने केलेल्या कारवाईनंतरही पुन्हा हॉटेल सुरू करून व्यावसायिक न्यायालयात गेले होते. आता महापालिका पुन्हा सर्वेक्षण करणार आहे.

‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे

महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून रूफ टॉप हॉटेलवर वारंवार कारवाई केली जाते. त्यानंतर पुढील काही दिवसांतच ती पुन्हा सुरू झाल्याचे निदर्शनास येते. संबंधित हॉटेलला जिल्हा प्रशासनाकडून परवाने मिळतात.

त्यामुळे आता बार, हॉटेलचे मद्य परवाने रद्द करण्याची शिफारस महापालिका जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे. तसेच असे परवाने देण्यापूर्वी महापालिकेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घ्यावे, अशी मागणी महापालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकेने कारवाई केल्यानंतरही अशी हॉटेल सुरू झाली आहेत. त्यांच्याविरुद्ध आता गुन्हे दाखल केले जातील. पुन्हा सर्वेक्षण सुरू करून त्यांच्याविरुद्ध कारवाई होईल.

- युवराज देशमुख, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT