Crime filed against posting controversial posts on social media police Satish Hodgar pune esakal
पुणे

Social Media : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - सतीश होडगर

सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट, कमेंट टाकून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

डी. के. वळसे पाटील

मंचर : “मंचर शहराला राष्ट्रीय ऐक्याची फार मोठी परंपरा आहे. सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. परंतु गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट, कमेंट टाकून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अशा दोषी व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष यंत्रणा उभी केली आहे. दोषी आढळणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.” असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिला .

मंचर (ता.आंबेगाव) येथे सोमवारी (ता.१२) संध्याकाळी नगरपंचायत सभागृहात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत होडगर बोलत होते. यावेळी मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, राजाराम बाणखेले, सुनील बाणखेले,

प्रवीण मोरडे, दत्ता गांजाळे, वसंतराव बाणखेले, शशिकांत बढे, कल्पेश बाणखेले, शिवाजीराव राजगुरू, महेश मोरे, अश्विनी शेटे, सचिन मोरडे, रहिबर अली, हाजी मन्सूर खान पठाण उपस्थित होते.

सुरेश भोर म्हणाले, “येथील हिंदू - मुस्लीम व सर्वच जाती धर्माचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शांतता व सुव्यवस्था टिकविणे प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.” अँड. अविनाश रहाणे म्हणाले, “चुकीचे काम करणार्याचे कोणीही समर्थन करू नये. दर दोन महिन्यानी शांतता समितीची बैठकीचे आयोजन करावे. त्यामुळे समज, गैरसमज दूर होण्यासाठी मदत होईल.”

संजय थोरात म्हणाले, “सामाजिक सलोखा राखून व समाजाप्रती आपले काहीतरी देणे आहे. ही भावना मनात ठेवून सर्वांनी एकत्रित आनंदाने राहणे गरजेचे आहे.” “बेकरी व अन्य उद्योगात काम करणारे कामगार व भाडेकरूच्या नोंदी मंचर पोलिसांनी कराव्यात एखादी बाहेरची व्यक्ती शांतता भंग करण्याचे काम करत असेल तर पोलिसांनी कार्यवाही करावी.” अशी मागणी आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार यांनी केली.

यावेळी दत्ता थोरात, संतोष खामकर, आशिष पुगलिया याची भाषणे झाली. जे.के.थोरात, मंगेश बाणखेले, जगदीश घिसे, सतीश बेंडे, शशिकांत बाणखेले, संदीप बाणखेले, गणेश खानदेशे यांनी चर्चेत भाग घेतला. उपस्थितानी ‘हम सब एक है’ अशा घोषणा देऊन सामाजिक ऐक्य आबाधित असल्याचा संदेश दिला. सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी अखेर निर्दोष, अमित शहा मानहानी प्रकरणात सुल्तानपूर कोर्टाचा मोठा दिलासा

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लेटमार्क! मध्य रेल्वेवर वाहतूक विस्कळीत, लोकलचा १५-२० मिनिटं खोळंबा

Ashirvad Sooryavanshi Century: १९ चौकार, ६ षटकार... ११९ चेंडूंत १६८ धावा! वैभव सूर्यवंशीच्या भावाने गाजवले मैदान Video

राष्ट्रपती भवनाजवळ नॉर्थ ब्लॉकमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी

Pune News: पुणेकरांना दिलासा! जीपीएस यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त; रखडलेल्या जमीन मोजण्या पुन्हा सुरू होणार

SCROLL FOR NEXT