Crime1.jpg
Crime1.jpg 
पुणे

कोथरुडमध्ये गुंडांचा धुडगूस: पोलिसांच्या डोक्याला ताप

सकाळवृत्तसेवा

कोथरुड (पुणे) : कोरोनाशी लढा सुरु असताना गुंडांच्या धुडगूसामुळे कोथरुड पोलिसांचा ताप वाढला आहे. पोलिस मित्र आणि भाजपचे कार्यकर्ते असलेल्या संदीप वामनराव कुंबरे (वय 43 रा. गाढवे कॉलनी, कोथरुड) यांच्यावर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राहुल रामदास सणस (रा. सुतारदरा, कोथरुड) याने केला.

सुतारदरा येथे कुंबरे यांचे मेडिकलचे दुकान आहे. शनिवारी दुपारी एक वाजता जेवायला घरी निघाले असताना, सणस याने कुंबरे यांच्यावर कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार केले. लोकांनी आरडाओरडा केल्याने सणस पळून गेला. कुंबरे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोथरुड पोलिसांनी राहुल सणस यास ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. सुतारदरा येथे आणखी एक मारहाणीची घटना घडली असून यामध्ये सुध्दा कोयत्यासारख्या शस्राचा वापर आरोपींनी केला होता. यामध्ये जखमी असलेली व्यक्ती एका खाजगी रुग्णालयात दाखल केलेली आहे.

म्हातोबानगर येथे गुंडांनी सोमनाथ कुंभार, सौरभ गाऊडसे, दत्ता तुकाराम धुमाळ, सुगंधा दत्ता धुमाळ यांना मारहाण केली. यासंदर्भात दत्ता धुमाळ (वय 41, रा. म्हातोबादरा) यांनी कोथरुड पोलिसात तक्रार नोंदवली आहे. कोथरुडमधील सुतारदरा, म्हातोबादरा येथे गुंड टोळ्यांचा धुडगूस वाढला असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी महिला व नागरिकांकडून होत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर विविध कामात व्यस्त असलेल्या पोलिसांना आता गुंडांच्या धुडगूसामुळे त्रास वाढला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

एका पोलिस कर्मचा-याने सांगितले की, कोरोनामुळे अनेक गुन्हेगारांना सोडण्यात आलेले आहे. त्यात दारुची दुकाने सुरु झाल्यामुळे  गुन्हेगारी प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. परराज्यात जाणा-या कामगारांची नोंदणी, आरोग्य तपासणी, क्वारंटाइन केलेल्या लोकांवर लक्ष ठेवणे एवढी सगळी कामे तीस चाळीस पोलिस कसे करु शकतील. आम्ही तरी काय काय करणार.


कोथरुड पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरण बालवडकर म्हणाले की, यातील एका घटनेतील आरोपीला पोलिसांनी पकडले असून इतर प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु आहे.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT