पुणे

बनावट शिक्‍क्‍याने कर्जदारांना नोटिसा 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लोकन्यायालयात खटला दाखल नसताना कर्जदाराला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे बनावट शिक्के मारून नोटीस पाठविल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी कोटक महिंद्रा बॅंक आणि कर्ज वसूल करणाऱ्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक राजेश नारायण आहेर (वय 50, रा. साई गणेश विहार, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटक महिंद्रा बॅंकेने क्रेडिट कार्डची थकबाकी वसूल करण्यासाठी एका एजन्सीला काम दिले. बॅंकेचे अधिकारी व एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून कर्जदारांना लोकन्यायालयात हजर रहाण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या नावाने कर्जदारांना नोटिसा पाठविल्या होत्या. त्यामुळे हर्षल बलकवडे हे यासंदर्भात प्राधिकरणात चौकशीसाठी आले होते. आहेर यांना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी बलकवडे यांच्या नोटिशीची झेरॉक्‍स काढून घेऊन त्याबाबत कळविले जाईल, असे सांगितले. त्यानंतर अन्य दोन व्यक्ती प्राधिकरणात चौकशीसाठी आल्या होत्या. त्या वेळी प्राधिकरणाच्या नावाचे बनावट शिक्के मारून लोकन्यायालयात उपस्थित राहण्यासाठी ज्या नोटिसा बजावल्या आहेत त्यावर बनावट शिक्के असल्याचे आहेर यांच्या लक्षात आले. 

यामध्ये प्राधिकरणासह कर्जदारांचीही फसवणूक झाल्याने याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत उपनिरीक्षक संदीप चव्हाण म्हणाले, की प्राधिकरणाच्या नावाने बनावट नोटीस तयार करणाऱ्या बॅंकेच्या व एजन्सीच्या अधिकाऱ्यांचा शोध सुरू आहे. त्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाची जास्त माहिती मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT