Crime esakal
पुणे

Pune Crime : 'त्या' तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्याला चार दिवस पोलिस कोठडी

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीला बुधवारी (ता.२८) सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेमसंबंध संपविल्याच्या रागातून त्याने मंगळवारी (ता. २७) सकाळी दहाच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे. हल्ला झालेल्या २० वर्षीय मुलीने याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाधववर खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीवर हल्ला करीत असतानाच जाधव याला लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी पकडले. त्यामुळे या हल्ल्यातून तरुणी बचावली. त्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी चोप देऊन जाधव याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अटक केल्यानंतर जाधव याला बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावा, अशी मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपी जाधव याला एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक पुनम पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहोत.

आरोपीच्या रक्ताचे होणार रासायनिक विश्लेषण -

आरोपी जाधव याच्या रक्ताचा नमुना काढून तो रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा पुढील तपासासाठी वापर होणार आहे. तर जाधव याने कोयता कोठून आणला, याबाबत त्याकडे तपास करायचा आहे. हा गुन्हा जाधव याने कोणाच्या सांगण्यावरून केला आहे का? याची देखील चौकशी करण्यात येणार आहे.

त्यासाठी त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. वर्षाराणी जाधव यांनी केला. आरोपीची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का याचा देखील पोलिस तपास करीत असल्याचा युक्तिवाद ॲड. जाधव यांनी केला.

तरुणीसोबत असलेल्या मित्रानेच सोसला पहिला घाव -

जाधव याने तरुणीवर हल्ला केला तेव्हा तिच्या बरोबर असलेला तिचा मित्र तेथून पळून गेला, अशी चर्चा मंगळवारी सुरू झाली होती. मात्र तरुणीसोबत असलेल्या मित्रानेच जाधव याने केलेला पहिला वार सोसला.

या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुजेट व्हायरल झाले आहे. त्यात देखील पहिल्यांदा त्या मित्रावरच हल्ला झाल्याचे दिसते. त्यानंतर जाधव याने पाठलाग करून तरुणीवर हल्ला केला. जाधव याने केलेल्या हल्ल्यात तरुणीच्या मित्राच्या डाव्या हाताला जखम झाली आहे. उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT