crime news Arrested for buying firearms and mobile phones with stolen money pune  sakal
पुणे

चोरीच्या पैशातून अग्निशस्त्रे व मोबाईल खरेदी करणारे जेरबंद

वानवडी पोलिसांची कामगिरी : १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : चोरीच्या पैशातून अग्निशस्त्रे आणि महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. नितीन ऊर्फ दया विश्वास पोळ (वय ३३), साहील खंडू पेठे (वय २०, दोघे रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे) आणि सोने खरेदी करणारा रोहित संजय पंडित (वय ३७, रा. ससाणेनगर, माळीणबाई शाळेजवळ, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. साहिल पेठे याने विधिसंघर्षित बालकाच्या मदतीने वस्तीमध्ये दहशतीसाठी अग्निशस्त्र घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, रंगनाथ सदाशिव शिंदे (वय ५५, रा. साठेनगर, तरवडेवस्ती, महंमदवाडी, हडपसर, पुणे) यांच्या घरातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी महंमदवाडीमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी नितीन ऊर्फ दया विश्वास पोळ यास पकडून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याने साहील खंडू पेठे याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचे सोने रोहित संजय पंडित या सोनाराने खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीकडून सहा लाख ४० हजार रुपये किमतीचे (१६० ग्रॅम) सोन्याचे दागिने, १९ हजार रुपये किमतीचा ओप्पो मोबाईल, जुन्या गाड्या दुरुस्तीसाठी वापरलेले ५० हजार रुपये किमतीची यामाहा मोटारसायकल व ८० हजार रुपये किमतिची होंडा अॅसेन्ट कार असा एकूण आठ लाख ३९ हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक गुन्हे) संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, सहायक पोलीस फौजदार संतोष तानवडे, पोलीस अंमलदार अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड सर्फराज देशमुख, सचिन गवळी, सागर जगदाळे, शिरीष गोसावी, निळकंठ राठोड, अमित चिव्हे, गणेश खरात, दीपक भोईर, सिद्धेश्वर कसबे आणि महिला पोलीस शिपाई राणी खांदवे यांच्या पथकाने ही विशेष कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT