crime news Bitcoin case Bail application of cyber expert Pankaj Ghode rejected pune sakal
पुणे

बीटकॉईन प्रकरण : तथाकथित सायबर तज्ञ पंकज घोडेचा जामीन अर्ज फेटाळला

बिटकॉईन प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी नेमलेल्या घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील यांनी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी स्वत:चे व त्याच्याशी इतर संबंधित व्यक्तीच्या वॉलेटवर घेतले

सकाळ वृत्तसेवा

बिटकॉईन प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी नेमलेल्या घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील यांनी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी स्वत:चे व त्याच्याशी इतर संबंधित व्यक्तीच्या वॉलेटवर घेतले

पुणे : बिटकॉईन (क्रिप्टोकरन्सी) या आभासी चलन फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेला तथाकथित सायबर तज्ञ पंकज घोडेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा आदेश दिला. बिटकॉईन प्रकरणात पोलिसांना तांत्रिक मदत करण्यासाठी नेमलेल्या घोडे (वय ३८, रा. ताडीवाला रोड) आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ प्रभाकर पाटील (वय ४५, रा. बिबवेवाडी) यांनी मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सी स्वत:चे व त्याच्याशी इतर संबंधित व्यक्तीच्या वॉलेटवर घेतले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. एप्रिल २०१८ पासून २०२२ दरम्यान हा प्रकार घडला. घोडे हा दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात पोलिसांना तांत्रिक तज्ञ म्हणून तपासात मदत करत होता.

यावेळी, तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी त्याकडे विश्वासाने दिलेल्या डेटाचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून तांत्रिक अहवालाचे बनावटीकरण केले. त्याद्वारे, त्याने शासन व गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची क्रीप्टो करन्सी घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी त्याने न्यायालयात अर्ज केला. सरकारी वकील उज्ज्वला रासकर यांनी त्यास विरोध केला. घोडे याने निगडी व दत्तवाडी पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यासंबंधी जप्ती बाबतच्या अहवालात जाणीवपूर्वक बनावट स्क्रिनशॉट जोडले असून खोटी माहिती सादर केली आहे. याखेरीज, क्रिप्टोकरन्सी पोलिस वॉलेटमधून शेकडो बिटकॉईन इतर क्रिप्टोकर्नसी वॉलेटमध्ये वळविले आहे. त्याचा गुन्ह्यात तपास असल्याचे स्पष्ट झाले असून त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्याला जामीन मंजूर झाल्यास तो तपासामध्ये अडथळा आणण्याची शक्यता असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्याचा युक्तिवाद अ‍ॅड. रासकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

प्रेमानंद महाराज बालक, संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगावा; जगद्गुरू रामभद्राचार्यांचं थेट आव्हान

सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मेट्रोच्या वेळेत बदल, पहिली ट्रेन 'या' वेळेत सुटणार

Weekly Career Horoscope: गजकेसरी योगामुळे 'या' राशींच्या जीवनात येणार आहे आर्थिक समृद्धी आणि कामातील जबरदस्त प्रगती!

Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT