crime news cricket betting Debt on B Tech Engineer student pay off the debt did theft pune Sakal
पुणे

क्रिकेटप्रेमी बी.टेक इंजिनीअर बेटिंगमुळे झाला कर्जबाजारी, कर्ज फेडण्यासाठी झाला चोर

सव्वा चार लाखाच्या चोरीप्रकरणी संशयित आरोपी बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : क्रिकेटवरील प्रेमापोटी बी.टेक इंजिनीअरने नामांकीत कंपनीतील चांगल्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले. पुढे "आयपीएल'सारख्या क्रिकेट सामन्यांसाठी तो बेटींगही करायला लागला. पण इथे मात्र नशीबाचे काटे उलटे फिरले, बेटींगमुळे तो कर्जबाजारी झाला, त्यातुन बाहेर पडण्यासाठी अखेर त्याने चोरीचा मार्ग पत्करला. विमानाने क्रिकेट सामन्यांच्या ठिकाणी पोचून तेथे खेळाडूंचे टॅब, वस्तु, डेबीट कार्ड, पैसे चोरणाऱ्या या उच्चशिक्षित चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी मात्र थेट हरियाणात जाऊन बेड्या ठोकल्या.

ट्‌विंकल अर्जुन अरोरा (वय 30, रा. बलभगड, फरीदाबाद, हरियाणा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी एका नागरीकाने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे 15 मे रोजी बिबवेवाडी येथील राजयोग लॉन्स येथे क्रिकेट सामना खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कारमध्ये मोबाईल, टॅब, डेबीट कार्ड अशा वस्तु ठेवल्या होत्या. मात्र ख्रिकेट खेळण्यासाठी जाण्यापुर्वी ते कारचा दरवाजा लावण्यास विसरुन गेले. दरम्यान, त्यांच्या कारमधील दोन डेबीट कार्ड, एक टॅब चोरट्याने चोरुन नेला. त्याने त्यांच्या डेबीट कार्डमधून एक लाख रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. तर तीन लाख रुपयांची खरेदी केली, असे एकूण सव्वा चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला. या घटनेनंतर त्यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

असा घेतला पोलिसांनी शोध

चोरट्याने डेबीट कार्डचा वापर करून लष्कर परिसरातुन दोन महागडे मोबाईल खरेदी केल्याचे तांत्रिक तपासातून निष्पन्न झाले. तसेच त्याने हरियाणा येथील बदरपुर भागातील एटीएममधून फिर्यादीच्या कार्डचा वापर करुन पैसे काढल्याचीही माहिती पुढे आली. त्यानुसार, संबंधित आरोपी हा विमानानेच गेला असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानुसार, पोलिसांनी लोहगाव विमानतळावर जाऊन सीसीटीव्ही चित्रीकरण आणि विमानाच्या तिकीटाचे बुकींग तपासले. त्यावरुन संबंधित आरोपीचे नाव ट्‌विंकल अरोरा असल्याचे व तो मुळचा हरियाणा येथील असल्याचे पोलिसांना समजले.

क्रिकेट बेटींग, कर्जबाजारीपणा आणि चोरीचा मार्ग !

तांत्रिक विश्‍लेषण करतानाच संशयित आरोपीचा मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार, बिबवेवाडी पोलिसांचे एक पथक हरियाणा येथे गेले होते. तेथे मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी तो एका घरात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, पोलिसांनी त्यास सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन पुण्याला आणले. त्याच्याकडे चौकशी केली. ट्‌विंकल हा उच्चशिक्षित कुटुंबातील असून तो बी.टेक इंजिनीअर आहे. त्याला हरियाणातील नामांकीत कंपनीमध्ये नोकरीला होता. परंतु, क्रिकेटवरील प्रेमामुळे नोकरी सोडून त्याने क्रिकेट सामन्यावर बेटींग करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये तो कर्जबाजारी झाल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडला. तो "क्रिकेट स्कोर' नावाच्या संकेतस्थळावरुन क्रिकेट सामने होणाऱ्या ठिकाणांची माहिती घेत. विमानाने तेथे पोचून तो खेळाडूंच्या कारमधील वस्तु, पैसे, कार्ड चोरुन पुन्हा विमानाने हरियाणाला पोचत होता. हि कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलिस कर्मचारी शामराव लोहमकर, तानाजी सागर, संतोष जाधव, शिवाजी येवले व राहुल शेलार यांच्या पथकाने केली.

"बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करुन तांत्रिक विश्‍लेषण करीत त्यास अटक केली. आरोपीने यापुर्वीही विमानाने पुण्यात येऊन भुगाव येथेही याच प्रकारे चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच चंदीगडसह इतर ठिकाणी असे गुन्हे केल्याची शक्‍यता आहे.''

- नम्रता पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीने आणखी एकाने जीवन संपविले

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT