Lonikabhor Accident Sakal
पुणे

लोणी काळभोर : नियतीने एकाचवेळी दोघींना घेतले हिरावून

कंटेनर व दुचाकीत झालेल्या अपघातात कदमवाकवस्ती येथील सख्ख्या बहिणींचा मृत्यू...!

जनार्दन दांडगे.

लोणी काळभोर : पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात कंटेनरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत सख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (ता. २०) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला आहे. अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये दोन्ही बहिणींचा जागेवरच चेंदामेंदा झाला. व जागेवरच मृत्यू झाला. गायत्री नंदकुमार शितोळे (वय-१७) व राजश्री नंदकुमार शितोळे (वय-१०, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी बहिणींची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री व राजश्री या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात राहत होत्या. दोघीही लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या प्रशाला विद्यालयात शिक्षण घेत होत्या. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मामा पांडुरंग नवनाथ भिक्षे हे दुचाकीवरून गायत्री व राजश्रीला शाळेत सोडायला निघाले होते. शाळेत जात असताना लोणी स्टेशन चौकात सोलापूरच्या दिशेने निघालेल्या कंटेनरने मामा चालवीत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मामा हे रस्त्याच्या बाजूला उडून पडले. तर गायत्री व राजश्री या रस्त्याच्या मधोमध पडल्याने कंटेनर त्यांच्या अंगावरून गेला. व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दोन मुलींचा मृत्यूस कारणीभूत ठरलेला कंटेनर लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदर कंटेनर चालक पळून गेला असून लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, महामार्गाशेजारीच हाकेच्या अंतरावर नामंकित हॉस्पिटल व लोणी काळभोर पोलीस ठाणे आहे. तरीही ना वाहतूक शाखेचे पोलीस, ना शेजारी असलेले डॉक्टर, व ॲम्बुलन्स आली नसल्याने तब्बल अर्धा ते पाऊन तास या मुलींना मदत मिळाली नाही. त्यामुळे अपघात झालेल्या ठिकाणी दोन्ही मुली तशाच पडून होत्या. त्यामुळे मदत मिळाली नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT