Crime News  esakal
पुणे

Crime news : भावाच्या खुनाचा घेतला बदला...बघ आपून काय केलंय...

तीनपैकी दोन अल्पवयीन आरोपींना हवेली पोलिसांनी वेल्हे येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याची चोवीस तासांच्या आत उकल करण्यात हवेली पोलिसांना यश आले आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या भावाच्या खुनाचा बदला म्हणून तीन अल्पवयीन आरोपींनी राहुल चंद्रकांत आटोळे (वय ३६) याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. तीनपैकी दोन अल्पवयीन आरोपींना हवेली पोलिसांनी वेल्हे येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.

२३ मार्च २०२२ रोजी नांदेड फाट्याजवळ एका भंगाराच्या दुकानात बसलेल्या सराईत गुन्हेगार मारुती ढेबे (वय २०) याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. यामध्ये नांदेड फाट्याजवळील गोसावी वस्ती येथील आरोपी होते. ढेबे याची हत्या झाल्यापासून त्याचा बदला म्हणून लहान भाऊ गोसावी वस्तीतील एकाला तरी संपवायचे असे म्हणत होता.

त्यानुसार ता ११ जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तीन अल्पवयीन आरोपींनी नांदेड फाट्याजवळील कालव्यालगत राहुल आटोळे याचा धारदार शस्त्राने वार करुन खून केला व मृतदेह झुडपात फेकून दिला होता. खून झालेल्या राहुल आटोळे याचा अगोदर कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नव्हता,

त्यामुळे त्याला नेमके कोणी व का मारले हे स्पष्ट होत नव्हते. रात्री उशिरा हवेली पोलिसांना हा खून तीन अल्पवयीन तरुणांनी केल्याची खबर मिळाल्यानंतर हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नीलेश राणे, विलास प्रधान, अशोक तारू, पोलिस नाईक राजेंद्र मुंढे, संतोष भापकर यांनी वेल्हे येथे लपून बसलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतले.

व्हिडिओ इन्स्टाग्रामवर...

रात्री नऊ वाजता राहुल आटोळे याचा खून केल्यानंतर आरोपी मृतदेह झुडपात फेकून निघून गेले. रात्री दीड वाजता पुन्हा घटनास्थळी जाऊन आरोपींनी मृतदेहाचे व्हिडिओ काढले व मित्राला इन्स्टाग्रामवर पाठवले, तसेच खाली मेसेजही केला की, ‘बघ आपून काय केलंय.’ यावरून आरोपींनी जाणीवपूर्वक दहशत पसरविण्यासाठी अत्यंत निर्घृणपणे हा खून केल्याचे दिसून येत आहे.

तीनही आरोपी अल्पवयीन असले तरी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. यातील एका आरोपीचे वय तर १७ वर्ष ११ महिने आणि २८ दिवस आहे, म्हणजेच गुन्हा करण्याच्या दिवशी तो केवळ दोन दिवसांनी अल्पवयीन होता. अत्यंत निर्घृणपणे खून करुनही अल्पवयीन असल्याने कायद्याचा आधार घेऊन सुटता येईल, याची पूर्ण जाणीव या आरोपींना असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT