Crime news pune suicide case of young girl due to less marks in exam  Sakal
पुणे

मुलीची चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

बारावीच्या सराव परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे घडला प्रकार, हडपसर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद

साकळ वृत्तसेवा

पुणे : अल्पवयीन मुलीने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हि घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील ऍमनोरा पार्क परिसरात घडली. बारावीच्या सराव परिक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या कारणावरुन मुलीने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. अवंतीका कुलशेखर (वय 17, रा. ऍमनोरा पार्क परिसर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवंतिका तिचे आई-वडील व छोट्या भावासमवेत ऍमनोरा पार्क परिसरातील एका इमारतीमध्ये राहते. अवंतिका इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी तिच्या शाळेमध्ये भरविण्यात आलेल्या पालक मेळाव्यासाठी तिचे आई-वडील गेले होते. तर लहान भाऊ हा शाळेत गेला होता. त्यामुळे अवंतिका घरी एकटीच होती. तिचे आई-वडील पालक मेळाव्यावरुन आले होते. ते इमारतीच्या लिफ्टमधून येत असतानाच तिने घराचा दरवाजा आतुन बंद केला. त्यानंतर इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या घरातुन खाली उडी मारुन आत्महत्या केली. अवंतिकाला बारावीच्या सराव परिक्षेत कमी गुण मिळाले होते, त्यामुळे तिने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT