crime news pune Two arrested for attempt to killed a ambulance driver on fare issue  Sakal
पुणे

रुग्णवाहिकेच्या भाड्यावरुन चालकाचा खुनाचा प्रयत्न; दोघांना अटक

बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात रुग्णवाहिकेचा व्यवसाय करणाऱ्या चालकास भाडे घेण्याच्या कारणावरुन दोघांनी जबर मारहाण करीत कटरने वार केले. हि घटना बुधवारी दुपारी पावणे तीन वाजता ससुन रुग्णालयाच्या परिसरात घडली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघांना अटक केली. किरण विठ्ठल राजपुरे, निखील ज्ञानदेव राजपुरे (दोघेही रा. तुकाई दर्शन, काळेपडळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर रणजीत रामचंद्र जानकर (वय 30, रा.मांजरी, पाटील हाऊस,हवेली) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी जानकर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणजीत जानकर आणि संशयीत आरोपी हे ससून रुग्णालयाच्या परिसरात रुग्णवाहिकेचा व्यवसाय करतात. त्यांची एकमेकांशी ओळख आहे. बुधवारी (ता.3) दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास जानकर, किरण व निखील हे तिघेजण ससून रुग्णालयाच्या परिसरात थांबले होते. त्यावेळी दोघांनी जानकर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. "तु खुप दहशत करतो, आमचे भाडे घेतो व आम्हाला मारहाण करतो आज तुला सोडणार नाही' असे म्हणत त्यांच्याजवळील चहाचे भांडे जानकर यांच्या डोक्‍यात घातले. तसेच प्लॅस्टीकच्या कटरने त्यांच्यावर वार केले. या हल्ल्यात जानकर हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना तत्काळ अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

Pune News : औषधाच्या गोळीतून ब्लेडचे तुकडे खायला दिले; पतीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, पत्नी फितूर होऊनही वैद्यकीय पुराव्यांवर निकाल

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT