crime news Sexual abuse of minor girl Life imprisonment Pune Sessions Court
crime news Sexual abuse of minor girl Life imprisonment Pune Sessions Court sakal
पुणे

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एकाला मरेपर्यंत जन्मठेप; पुणे सत्र न्यायालयाचा निकाल

निलेश बोरुडे

किरकटवाडी: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने किरकटवाडी (ता. हवेली) येथील छबी मोहन सोनी (वय 25, मुळ रा. उत्तर प्रदेश) यास पुणे सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप व पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश के.के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला आहे.

ओळखीचा फायदा घेत सोनी याने चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. मुलीची प्रकृती खालावल्याने तीला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता हा प्रकार उघडकीस आला. 2019 साली मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार हवेली पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी सोनी याला हवेली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या पथकाने पुणे रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले होते.

पोलीस निरीक्षक शेळके यांनी सदर प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत पुरावे गोळा केले. त्याआधारे आरोपी सोनी यास न्यायालयाने दोषी ठरवले व सदर शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याच्या न्यायालयीन कामकाजात सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहाय्यक फौजदार विद्याधर निचित व पोलीस हवालदार सचिन अडसूळ यांनीही महत्वाची भूमिका बजावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT