pune crime sakal
पुणे

Pune Crime : पुण्यात NIA ची मोठी कारवाई; ISISशी संबंधित एकाला अटक

पुणे इसिस मॉड्युल, दहशतवादी कारवायाच्या कटात सहभाग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात दहशतवादी कारवाया करण्याच्या कटात (पुणे इसिस मॉड्युल) सहभागी असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आणखी एका आरोपीला शुक्रवारी अटक केली.

शमील साकिब नाचन (रा. पडघा, ता. भिवंडी, जि. ठाणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आणि स्फोट घडवून आणण्यासाठी घेतलेल्या चाचणीत सहभागी असल्याचे आढळून आले आहे.

एनआयएने यापूर्वी झुल्फिकार अली बडोदावाला, महम्मद इम्रान खान, महम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादीर पठाण अशा पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.

इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी हे दोघे ‘सुफा’ दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. एप्रिल २०२२ मध्ये राजस्थानात एका कारमधून स्फोटके जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात एनआयएने या दोघांना फरार घोषित केले होते.

शमिल याच्यासह अटक करण्यात आलेले दहशतवादी इसिसच्या स्लीपर मॉड्यूलचे सदस्य आहेत. पुण्यातील कोंढवा येथील घरातून त्यांची दहशतवादी कृत्ये सुरू होती. त्यांनी बॉम्ब तयार करण्यासाठी स्फोटके आणि इतर साहित्य एकत्र केले होते.

तसेच बॉम्ब तयार करण्याच्या प्रशिक्षणातही त्यांनी सहभाग घेतला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी तयार केलेल्या बॉम्बची चाचणी घेण्यासाठी नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता. देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडविण्याचा इसिस दहशतवादी संघटनेचा अजेंडा आहे. या आरोपींनी देशविघातक कृत्ये करण्याचा कट रचला होता, ही बाब एनआयएच्या तपासात समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT