crime  sakal
पुणे

बारामती पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केली धडक कारवाई

दुचाकी चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविणे, मोठ्याने आवाज करत दुचाकी चालविणे, नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर आज शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.

मिलिंद संगई,

दुचाकी चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविणे, मोठ्याने आवाज करत दुचाकी चालविणे, नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर आज शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.

बारामती - दुचाकी चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविणे, मोठ्याने आवाज करत दुचाकी चालविणे, नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर आज शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. विद्यार्थ्यांकडून वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांच्याकडे आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर आज दुपारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ पोलीस उपनिरीक्षक घोडके , मोटे, पाटील यांच्या चार टीम तयार करून एकाच वेळी वेगवेगळ्या कॉलेजवर पाठवल्या. टीसी कॉलेज आणि अनेकांत शाळा, आर.एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल, शाहू हायस्कूल, या ठिकाणी पोलिसांनी सध्या वेशात जाऊन कॉलेज सुटण्याच्या वेळेस मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. दरम्यान या कारवाईनंतर शिक्षक पालक यांना सुद्धा याबाबत पोलिसांनी माहिती दिली.

दरम्यान महाविद्यालयाच्या परिसरात वाहन चालविण्याचा परवाना नसताना दुचाकी हाकणा-या विद्यार्थ्यांवर कारवाई केली गेली. कॉलेज सुटण्याच्या वेळेस अनेक मुले विना नंबर प्लेट तसेच विनाकारण कॉलेज शाळा परिसरामध्ये मोटरसायकली घेऊन जोरात आवाज करून फिरत असतात. निर्भया पथक सुद्धा त्यावर सतत कारवाई करत असते परंतु आज एकाच वेळी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी कारवाई केली.

अनेक मुलांकडे स्वयंचलित स्पोर्ट बाईक आहेत, आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलाच्या ताब्यात गाडी घेताना त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का त्यांचे वय किती आहे हे पाहिले पाहिजे. दरम्यान या पुढील काळात पालकांनाही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा सुनील महाडीक यांनी दिला आहे. दंडात्मक कारवाईचा आकडा मोठा असल्याने पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT