crime pune police action Businessman from Surat arrested with pistol in Pune esakal
पुणे

Crime News : सुरतच्या व्यावसायिकास पुण्यात पिस्तुलासह अटक

सुरतच्या एका व्यावसायिकाला पुणे लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रेल्वे स्थानकावर विनापरवाना पिस्तुलासह अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सुरतच्या एका व्यावसायिकाला पुणे लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रेल्वे स्थानकावर विनापरवाना पिस्तुलासह अटक केली. त्याच्या ताब्यातून पिस्तुलासह सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. चौकशीदरम्यान त्याच्याकडे धक्कादायक माहिती समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अनिल कुमार उपाध्याय असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. उपाध्याय हा गुजरात येथील सुरतचा रहिवासी असून, तो कामानिमित्त पुण्यात आला होता. तो पुन्हा सुरत येथे परत जाताना पोलिसांनी त्याची झडती घेतली.

त्यावेळी त्याच्याकडे एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आली. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या असून, याबाबत पोलिसांकडून गुप्तता राखली जात आहे. या संदर्भात लोहमार्ग पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT