crime tet scam Accused Mukund Suryavanshi Admission card and money giving to Harkal brothers pune
crime tet scam Accused Mukund Suryavanshi Admission card and money giving to Harkal brothers pune  sakal
पुणे

टीईटी प्रकरण; एजंटाकडून आलेले ओळखपत्र व पैसे सूर्यवंशी देत होता हरकळांना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी मुकुंद सूर्यवंशी हा अपात्र परीक्षार्थीकडील प्रवेशपत्र व पैसे एजंटाकडून घेऊन ते अंकुश व संतोष हरकळ यांना देत असल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याच्या पोलिस कोठडीत १६ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांनी हा आदेश दिला आहे.

या गुन्ह्यात मध्यस्थीची भूमिका पार पाडणाऱ्या आरोपींना अटक करायची आहे. सूर्यवंशी याच्या मोबाईल क्रमांकाच्या सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यामध्ये टीईटी २०१९-२० साठी बसलेल्या परिक्षार्थींचे संपर्क क्रमांक असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्या दृष्टीने आणखी तपास करायचा असल्याने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी युक्तिवादा दरम्यान सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. सूर्यवंशी याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला सोमवारी (ता. १४) न्यायालयात हजर करण्यात आले होते. संतोष हरकळ याच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधून एक हजार २७० परीक्षार्थींची यादीतील एक हजार १२६ परिक्षार्थी व त्यांचे गुण वाढविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही परिक्षा घेण्याची जबाबदारी असलेला जी.ए. सॉफ्टवेअरचा संचालक, शिक्षण विभागातील तत्कालीन अध्यक्ष, तांत्रिक सल्लागार यांनी संगनमत करत अपात्र परिक्षार्थींकडून लाखो रुपये स्वीकारून परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर खोटा निकाल प्रसिद्ध करून व मुळ निकालाच्या यादीतही त्यांच्याकडील परीक्षार्थींची नावे टाकून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT