crime update Couple beaten by unknown four Diveghat pune Sakal
पुणे

दिवेघाटात अज्ञात चौघांकडून दाम्पत्यास मारहाण

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...!

जनार्दन दांडगे.

लोणी काळभोर : हडपसर- सासवड महामार्गावर दिवे घाटात काहीही कारण नसताना अज्ञात २० ते २२ वयोगटातील चौघांनी एकाला भरदिवसा लोखंडी रॉड, हाताने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (ता. १०) सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. निलेश प्रभाकर भोसुरे (वय- ३५ रा. ४५ ओ पाचवा मैल धर्मनगर वडगावशेरी, पुणे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून या मारहाणीत त्यांना जबर जखम झाली असून डावा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

याप्रकरणी कविता निलेश भोसुरे (वय- ३४) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता भोसुरे या बँकेत नोकरी करतात. मंगळवारी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पती निलेश व कविता त्यांच्याकडे असणाऱ्या दुचाकीवरून आई वडिलांना भेटण्यासाठी निरा या गावी चालल्या होत्या. सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास साड्या घेऊन पाऊने आकराच्या सुमारास दिवे घाटातून जात असताना पाठीमागून दोन दुचाकीवे दोघेजण गाडीजवळ आले.

यावेळी त्या दोघांनी त्यांची दुचाकी कविता बसलेल्या गाडीला आडवी मारली व पुढे बसलेल्या इसमाने कविता व तिच्या पतीस शिवीगाळ करुन गाडी थांबवण्यास सांगीतली. गाडी थांबवली असता दोन्ही इसम मारण्यासाठी अंगावर धावुन आले व पती निलेश यांना हाताने मारहान करण्यास सुरुवात केली. दूसरी दुचाकीवर आणखी अनोळखी इसम खाली उतरले त्यावरील दोन्ही इसमानी त्याचे हातातील लोखंडी रॉडने काहीएक कारण नसताना निलेशच्या डावे हातावर व डावे पायावर मारहान केली. तसेच पाठीमागे बसलेल्या इसमाने कविताच्या डावे खांदयावर लोखंडी रॉडने मारहान केली. दरम्यान, त्यानंतर एक गाडी हडपसर बाजुला व एक गाडी सासवड बाजुस निघुन गेली. यामध्ये निलेश यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना एका सासवड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी निलेश यांचा डावा हात व डावा पाय फ्रॅक्चर झालेचे सांगितले. त्यानंतर कविता या लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT