crime update dead body unknown man found Shirsuphal crime baramati police
crime update dead body unknown man found Shirsuphal crime baramati police esakal
पुणे

Baramati News : शिर्सुफळ मध्ये आढळला अनोळखी पुरुषाचा मृत्यूदेह

मिलिंद संगई बारामती

बारामती : तालुक्यातील शिर्सुफळ गावातील तलावामध्ये आज एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या तलावातील पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचे समोर आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सदर मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

पिवळ्या रंगाच्या दोरीने बांधून छातीवर व दोन्ही पायाला दगड बांधून सदर मृतदेह पाण्यात टाकून दिला असल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित मृतदेहाच्या अंगावर कोणतेही कपडे नसून याप्रकरणी खूनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शिर्सुफळचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सदाशिव लिंबाजी आटोळे यांचे जबाबावरुन आकस्मिक मयत दाखल करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पथके संबंधित मृतदेहाचीओळख पटविण्याचे कार्यवाही करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT