Yerwada Central Jail  sakal
पुणे

Pune Crime : त्या' तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्याची रवानगी येरवडा कारागृहात

प्रेमसंबंध सुरू ठेवण्यास नकार दिला म्हणून तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - प्रेमसंबंध सुरू ठेवण्यास नकार दिला म्हणून तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेमसंबंध संपविण्याच्या रागातून त्याने २७ जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यात मुलीच्या डोक्‍याला आणि हाताला जखम झाली आहे. तसेच तिचा मित्र देखील जखमी झाला होता. हल्ला झालेल्या २० वर्षीय मुलीने याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाधववर खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी (ता. १) सकाळी जाधव याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT