crime sakal
पुणे

Pune Crime : व्यसनासाठी मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

चोरट्याकडून ३२ मोबाईलसह दुचाकी हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्यसन भागविण्यासाठी मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून पाच लाख ६८ हजार रुपये किमतीचे ३२ मोबाईल आणि दुचाकी हस्तगत केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.

रैय्यान ऊर्फ फईम फय्याज शेख (वय २०, रा. निहाल हाईटस, मिठानगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील हिरा सदन इमारतीमधील घरातून चोरट्याने चार मोबाईल आणि रोकड चोरी केली. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास युनिट एककडून करण्यात येत होता. पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे यांना भवानी पेठेतील त्रिकोणी उद्यानाजवळ रैय्यान शेख येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीकडे चोरीचे ३२ मोबाईल संच आढळून आले.

मोबाईल चोरण्यासाठी दुचाकी चोरली

आरोपी घराच्या उघड्या असलेल्या दरवाजातून आणि खिडकीतून प्रवेश करून मोबाईल चोरत होता. त्याने काही पादचारी नागरिकांचेही मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली आहे. मोबाईल चोरण्यासाठी त्याने दुचाकी देखील चोरली होती.

त्याने खडक, फरासखाना, कोंढवा आणि समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुलै ते तीन सप्टेंबरदरम्यान मोबाईल चोरले आहेत. मोबाईल चोरीस गेलेल्या नागरिकांनी सोमवार पेठेतील गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT