Pune Crime  sakal
पुणे

Pune Crime : पूर्ववैमनस्यातून गुन्हेगाराचा खून;पुनावळ्यातील घटना,माजी नगरसेवकासह पाच जण अटकेत

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील वाद व खुनाचा कट रचल्याचे मनात धरून माजी नगरसेवकासह नऊ जणांच्या टोळक्याने सराईत गुन्हेगाराचा पालघनने वार करून खून केला.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील वाद व खुनाचा कट रचल्याचे मनात धरून माजी नगरसेवकासह नऊ जणांच्या टोळक्याने सराईत गुन्हेगाराचा पालघनने वार करून खून केला. ही घटना पुनावळे येथे घडली. याप्रकरणी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ याच्यासह पाच जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने मंगळवारी अटक केली असून इतर चौघे पसार आहेत.

अमोल ऊर्फ धनज्या गजानन गोरगले (वय ३५, रा. पुनावळे गावठाण) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर सूरज मुरलीधर गाडे (वय ३१, रा. गहुंजे) हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक शेखर अशोक ओव्हाळ (वय ३७, रा. मशीद शेजारी, पुनावळे), हृषिकेश विनायक चव्हाण (वय २३, रा. समता सोसायटी, सहकारनगर, पुणे), अभिषेक ऊर्फ मुन्ना बाळासाहेब ओव्हाळ (वय २४, रा. ओव्हाळ वस्ती, पुनावळे), समीर ऊर्फ बाबा नबी शेख (वय २०, रा. ओव्हाळ वस्ती, पुनावळे), वैभव सुरेश गायकवाड (वय २१, रा. साळुंब्रे, ता. मावळ) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे; तर रितेश रमेश ओव्हाळ, महेश कदम, गणेश कदम याच्यासह इतर आरोपी पसार आहेत.

याप्रकरणी अमोलचा भाऊ समीर ऊर्फ गोट्या गजानन गोरगले (वय ३२) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मृत अमोल सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चार गुन्हे दाखल होते. तसेच ‘मोका’ कारवाईदेखील झाली होती. दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अमोल व शेखर यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर शेखर याच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी अमोलसह इतर दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

अटकेत असलेला अमोल तीन महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. सोमवारी (ता. १) रात्री पावणेनऊच्या सुमारास अमोल मित्राबरोबर पुनावळे येथील समाधान हॉटेलच्या मागे महापालिका उद्यानासमोरील एका स्नॅक्स सेंटरमध्ये बसला होता. त्यावेळी आरोपींनी पालघनने अमोलवर हल्ला केला. यामध्ये अमोलसह सूरज जखमी झाला. अमोलला तातडीने थेरगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : पहिल्या तुकडीतील एकूण अग्निवीरांपैकी ७५% अग्निवीर सशस्त्र दलांमधील आपला ४ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT