राज्यभरात दरोडा व घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले. त्याच्या सह गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक. sakal
पुणे

Pune Crime : राज्यभरात घरफोड्याचे गुन्हे दाखल असणारा गुन्हेगार जेरबंद

गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी

निलेश कांकरिया

वाघोली : राज्यभरात दरोडा व घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट सहाने जेरबंद केले. त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीचे सुमारे अर्धा किलो सोने हस्तगत करण्यात आले. त्याच्यावर पुण्यासह राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

हंसराज रणजितसिंग टाक ( वय 18, रा हडपसर ) असे जेरबंद केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट सहा करत असताना टाक याने हा गुन्हा केल्याचे व तो कॅनॉल रोड हडपसर येथे येणार असल्याचे समजले. त्याला सापळा रचून पकडण्यात आले. त्याने हडपसर येथील गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर पुण्यातील सहा पोलीस ठाण्यात घरफोड्या व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त ( गुन्हे )अमोल झेंडे, सह्हायक पोलीस आयुक्त, ( गुन्हे ) सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्गल, पोलीस उपनिरीक्षक मैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीमुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, नितीन धाड़गे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT