पुणे

खरीप पीकस्पर्धेत सहभागी व्हा; ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज

CD

पीकस्पर्धेत सहभागी होण्यासाठी
३१ ऑगस्टपर्यंत मुदत

वाशीम : आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पादकता वाढविणाऱ्या आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी पीकस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
यंदापासून पीकस्पर्धेची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘पीक स्पर्धा नोंदणी’ सुविधा उपलब्ध आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या नऊ खरीप पिकांचा स्पर्धेत समावेश आहे. सर्वसाधारण तसेच आदिवासी गटासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असून ती स्वतः कसणे आवश्यक आहे. भातासाठी किमान २० गुंठे, तर इतर पिकांसाठी किमान ४० गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे गरजेचे आहे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी सहभागी होता येईल.
सर्वसाधारण गटासाठी प्रति पीक ३०० रुपये, तर आदिवासी गटासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क आहे. तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये, जिल्हास्तरावर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये, तर राज्यस्तरावर ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपये बक्षिसे दिली जाणार आहेत.
अर्जासाठी फार्मर आयडी, प्रवेश शुल्काचे चलन, आदिवासी शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र आणि बँक पासबुक अथवा चेकच्या पहिल्या पानाची प्रत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan on PM Modi : देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

Shahada Bribery Case: वनपाल संजय पवार यांना न्यायालयीन कोठडी; सव्वादोन महिन्यांनंतर ‘एसीबी’ची दुसरी कारवाई

प्रभासला नेमकं झालंय तरी काय? ऑर्थोपेडिक सर्जनच्या पोस्टने वेधलं फॅन्सचं लक्ष, फॅन्स म्हणाले- ‘अन्ना, तुम्ही ठीक आहात ना?’ POST VIRAL

Lanja Flyover Traffic Update : गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा! लांजा उड्डाणपुलावरून एकेरी वाहतूक सुरू; पाहा पूर्ण पूल कधी होणार खुला?

Marathi News Live Updates : JSSC CGL आणि CDPO परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला झारखंड उच्च न्यायालयाची स्थगिती

SCROLL FOR NEXT