पुणे

agn E Pik DCS E Ferfar 16112026_txt.txt

CD

पीकपाहणीच्या मुदतवाढीच्या
काळात दुबार नोंदी नको

राज्य सरकारच्या महसूल विभागाला सूचना

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः राज्यात खरीप हंगामाच्या ई-पीक पाहणीला मुदतवाढ देण्यात आली असली तरी दुबार पीक नोंदी होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
महसूल विभागाने १३ नोव्हेंबरला जमाबंदी आयुक्तालयाला पाठवलेल्या एका पत्रात दुबार पीक नोंदीबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘‘राज्यात कुठेही दुबार पीक नोंदणी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याकरिता स्वतः जमाबंदी आयुक्तांनी सूचना द्याव्यात. त्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांनी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या यंत्रणांना सूचित करावे,’’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. खरीप २०२६ हंगामाची संपूर्ण ई-पीकपाहणी केंद्र शासनाच्या अखत्यारीत डीसीएस अर्थात डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रणालीतून करण्याची तयारी राज्य शासनाने केली होती. भ्रमणध्वनीतील डीसीएस ॲप्लिकेशनद्वारे ही प्रणाली काम करणार होती. परंतु ऐनवेळी क्षेत्रीय पातळीवर योग्य नियोजन होऊ शकले नाही. परिणामी, ‘डीसीएस’ यंत्रणा कोलमडून पडली. शेवटी ‘डीसीएस’ऐवजी ‘ई-फेरफार’ प्रणालीद्वारे ई-पीक पाहणी करा, असे आदेश राज्य शासनाने सहा नोव्हेंबरला दिले.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की डीसीएसच्या ई-पीक पाहणीत राज्यातील विविध भागांमध्ये तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. सर्व्हरची अनुपलब्धता, जिओ-लोकेशनमधील त्रुटी, गाव नकाशांमधील तफावती तसेच काही गावांमध्ये गट क्रमांकांची अनुपलब्धता यामुळे डीसीएस प्रणाली काम करू शकली नाही. या तांत्रिक अडचणी तसेच क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळाच्या समस्येमुळे पीकपाहणी अपूर्ण राहणार होती. त्यामुळेच ‘ई-फेरफार’ प्रणालीद्वारे पीक नोंदींचा निर्णय घेतला गेला.
दरम्यान, ई-पीक पाहणीसाठी ‘ई-फेरफार’ प्रणालीचा केवळ १० नोव्हेंबरपर्यंतच वापर करावा, असे आदेश यापूर्वी राज्य शासनाने दिले होते. मात्र, या मुदतीत नोंदी पूर्ण होणार नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच जमाबंदी आयुक्तालयाने मुदतवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला. त्यानुसार अंतिम मुदत आणखी वीस दिवसांनी वाढवण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. ‘पीकपाहणीसाठी दिलेल्या मुदतवाढीच्या कालावधीत ई-फेरफार प्रणाली योग्य पद्धतीने सुरू राहण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य त्या तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्या,’ असेही आदेश राज्य शासनाने महसूल यंत्रणेला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RAHUL GANDHI GIRLFRIEND: 'ती सध्या काय करते?' राहुल गांधींना गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारताच दिलं असं उत्तर! म्हणाले...

Daulat Satpute Maharaj: दौलत सातपुते महाराजांच्या मृत्यूचं गूढ वाढलं; विहिरीत सापडला मोबाईल... पण टाकला कुणी?

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली

Sangli DCC Bank Election : आमदार विश्वजित कदमांच्या दाजींना मोठा दिलासा; महेंद्र लाड यांच्याविरोधातील याचिका लांबणीवर पडल्याने उद्याच अध्यक्षपदाची लॉटरी?

रेल्वेत सीट क्रमांक ७३ गायब, रिझर्व्हेशन असूनही वृद्धाची फरफट; अनेक डब्यात गोंधळ

SCROLL FOR NEXT