

Railway Coach Seat number 73 missing
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : रेल्वे गाड्यांमधील उशा, बेडशीट, ब्लँकेट, चादरी लंपास होतात हे आपण ऐकले असेल; पण आरक्षित केलेले आसनच बेपत्ता झाल्याचे कधी ऐकले आहे का? हॉस्पेट-मुंबई एक्स्प्रेसने करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला असा अनुभव आला आणि रात्रीच्या प्रवासात त्रासाला सामोरे जावे लागले. रेल्वेच्या या अजब कारभारावर प्रवाशांसह संघटनांनीही नाराजी व्यक्त केली आहे.