पुणे

पुरंदर तालुक्यात ‘भरारी पथके’ तैनात

CD

सासवड, ता. १३ : खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी प्रशासनाने व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश आमदार विजय शिवतारे यांनी दिले.

बोगस बियाणे आणि खतांची चढ्या दराने होणारी विक्री रोखण्यासाठी तालुक्यात ‘भरारी पथके’ तैनात करण्यात आली आहेत. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी बॅग आणि टॅग जपून ठेवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी केले. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
सासवड (ता. पुरंदर) येथे आयोजित तालुकास्तरीय खरीप हंगाम नियोजन सभेत ते बोलत होते. पुरंदर पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी (ता.१२) आढावा सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. यावेळी शिवतारे यांनी शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. यंदा तालुक्यासाठी १४०० क्विंटल भात, १६०० क्विंटल सोयाबीन, ३१५ क्विंटल बाजरी आणि २७०० क्विंटल भुईमूग बियाणे, तर १३,४०२ टन खतांचे नियोजन करण्यात आले आहे. एल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.

सभेला सभापती अमित झेंडे, उपसभापती प्रवीण जगताप, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, संदीप पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT