Bribe crime sakal media
पुणे

पाच हजाराची लाच घेताना पीडीसीसीच्या अधिकाऱ्यासह दोघे अटकेत

पीक कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकऱ्याकडे पाच हजारांची लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यासह दोघे अटकेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पीक कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकऱ्याकडे पाच हजारांची लाच मागणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) विकास अधिकाऱ्याला व वाडेबोल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सचिवाला पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पीडीसीसीच्या वाघोली शाखेत बुधवारी (ता. २२) ही कारवाई करण्यात आली.

दीपक रामचंद्र सायकर (वय ३८) आणि गोपीचंद दत्तात्रेय इंगळे (वय २७) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका ३३ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला पीक कर्ज हवे होते. हे कर्ज प्रकरण करण्यासाठी पीपीसीसीच्या वाघोली शाखेतील सायकर आणि वाडेबोल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा सचिव इंगळे त्यांच्याकडे लाचेची मागणी करत होता.

परंतु, तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी विभागात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. १६ जुलै ते २२ जुलै दरम्यान या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली. बुधवारी सापळा रचून सायकर याला पाच हजारांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. विभागाचे उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT