POL.jpg
POL.jpg 
पुणे

खडकी बाजार भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी तुफान गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार : सध्या पुण्यामध्ये कोरोनाचे वातावरण भयंकर आहे. असे असतानाही नागरिका निष्काळजीपणे वागत आहेत. संजय गांधी भाजी मंडई मध्ये रविवार (ता. १९ ) सकाळी आठ वाजल्यापासून भाजी खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. या ठिकाणी कोणाही नियमांचे पालन करत नव्हते. 

येथील संजय गांधी भाजी मंडई मध्ये रविवार (ता. १९ ) सकाळी आठ वाजल्यापासून भाजी खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. यावेळी संपूर्ण परिसर भाजी विक्रेते व ग्राहकांनी खचाखच भरून गेला होता सोशल डिस्टन्स व सर्व नियम धाब्यावर बसवीत भाजी विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू होता केवळ 40 भाजी विक्रेते व 20 फळ विक्रेत्यांना परवानगी दिली असताना, ही संपूर्ण मंडईत अंदाजे  दीडशेच्या वर विक्रेते व्यवसाय करीत होते.

दरम्यान, वेळीच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अतिक्रमण अधिकारी बी. एस. नाईक त्यांच्या ताफ्यासह आले त्याचवेळी खडकी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश ठाकूर यांनी बेकायदेशीर भाजी विक्री थांबवित फक्त 60 विक्रेत्यांना परवानगी देऊन इतर काही विक्रेत्यांवर कलम 188 नुसार कारवाई केली तर  बी. एस. नाईक यांनी ही नियमबाह्य विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे पहिला पाच दिवसांचा कालावधी संपल्यानंतर 19 जुलैला फक्त एकच दिवस सकाळी 8 ते 6 परवानगी देण्यात आली होती. ,मात्र भाजी मंडई मध्ये भाजी विक्रेत्यांनी बोर्डाने दिलेले नियम पायदळी तुडवत सर्रासपणे सर्वच विक्रेते येऊन व्यवसाय करीत होते. 20 ते 23 जुलै खडकी कॅन्टोन्मेंट, रेंजहिल, साप्रस, व खडकी बाजारात फक्त अत्यावश्यक सेवा सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत च सुरू राहतील अशी माहिती नाईक यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT