पुणे

पर्यटकांच्या शेकडो वाहनांची दाऱ्या व नाणे घाटात गर्दी

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : दाऱ्या व नाणेघाट येथे पर्यटनास बंदी असल्याने पोलीसांनी केलेली नाकाबंदी झुगारून पर्यटकांच्या शेकडो वाहनांनी रविवारी ता.२० रोजी गर्दी केली होती. कोरोनामुळे जुन्नर तालुक्यातील दाऱ्या व नाणेघाट परिसरात पर्यटनास बंदी असताना देखील येथे शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. विविध ठिकाणाहून दुचाकी- चारचाकी वाहनातून आलेल्या पर्यटकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून यामुळे गावची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तरी येथे येणाऱ्या पर्यटकांवर बंदी घालावी अशी मागणी आंबोलीच्या सरपंच नामाबाई अरुण मोहरे, उपसरपंच सखाराम काठे व ग्रामसेवक टी. एस.आंभिरे यांनी एका लेखी पत्राने जुन्नरचे वनक्षेत्रपाल अजित शिंदे तसेच पोलीस निरीक्षक विकास जाधव यांचेकडे ता.१७ रोजी केली आहे.

सुट्टीच्या दिवशी येथे शंभरहून अधिक वाहने येतात.पुणे,मुंबई, ठाणे येथून येणारे तसेच स्थानिक पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणेसाठी तसेच धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. स्थानिक नागरिकांनी त्यांना प्रतिकार केला तरी ते दाद देत नाहीत. यामुळे वाद होऊन प्रसंगी भांडणे होत असतात. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

दरम्यान जुन्नर पोलिसांनी शनिवार व रविवारी दाऱ्या व नाणेघाट येथे येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करणेसाठी जुन्नर आपटाळे मार्गावर नाकाबंदी केली होती. मात्र ही कारवाई फक्त स्थानिक लोकांवर केली गेली पर्यटकांना मात्र सोडून देण्यात आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी गर्दी झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. या परिसरातील जे लोक किराणा , बी- बियाणे , शेतीकाम यासाठी बाहेर पडले त्या लोकांवर कारवाई करण्यात आली. पोलीसांना थेट नाणेघाट व दाऱ्याघाट येथे नाकाबंदी करून कारवाई करायला पाहिजे अशी स्थानिकांची मागणी आहे. आपटाळे येथे नाकाबंदी केली तरी पर्यटक सुराळे मधील तेजुर रस्त्याने पीर बाबा रस्ता कोल्हाळवस्ती आपटाळे हायस्कुल रस्त्याने निघून जात होते. यावेळी वाहन परवाना नसणाऱ्यावर कारवाई केल्याने आता आता शेतावर जाताना देखील शेतकऱ्यांनी परवाना घेऊन जायचं का ? असा सवाल करण्यात येत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

Pune Accident: पुण्यात धक्कादायक घटना! वडाचे झाड अंगावर कोसळून दोन महिला जखमी; प्रकार CCTV मध्ये कैद

Satara News: माण तालुक्यात धक्कादायक प्रकार; एफडीएच्या भीतीने दूध रस्त्यावर ओतल्याने भेसळीच्या चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : TET पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Solapur: पत्नीच्या भांडणाला व तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय युवकाने राहत्या घरी घेतला गळफास मोहोळ तालुक्यातील यावली येथील घटना

SCROLL FOR NEXT