कुलगाम (जम्मू-काश्मीर), ता.१७ (पीटीआय) ः केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर अकरा नोव्हेंबर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार उमर निसार दार याच्याशीसंबंधित धक्कादायक माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. दार यानेच दहशतवाद्यांचा म्होरक्या लतीफ भट आणि अन्य सहकाऱ्यांना सहा महिने आश्रय दिला होता तसेच मदतसामुग्री देखील पुरविली होती. या दोघांनी हल्ला करण्यापूर्वी परिसराची पाहणी केली होती, असे तपासातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान कुलगाममधील चकमकीमध्ये दारचा खातमा करण्यात आला होता.
दार हा कधीकाळी ब्रेडच्या निर्मितीचे काम करत होता, गेल्या काही दिवसांपासून तो अचानक बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पुढे तो लष्करे तैय्यबाशी संबंधित ‘दि रेजिस्टन्स फ्रंट’ (फ्रंट) या संघटनेमध्ये सहभागी झाला होता. भट हा काश्मीर खोऱ्यामध्ये सक्रिय असलेला एक स्थानिक दहशतवादी असून तो याआधीही एका चकमकीतून वाचला होता. सुरक्षा दलांच्या हाती १० आणि ११ नोव्हेंबर रोजीचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज लागले असून त्यात दार आणि भट दोघेही स्पष्टपणे दिसत आहेत. या हालचालींवरून दोघे नेमके कोणत्या दिशेने जात आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते. मीर बझार, अखारान, हब्लिश आणि किलाम या भागांमध्येही दोघे फिरताना दिसून आले होते. या भागामध्ये गस्त घालून त्यांनी नेमका कोणत्या ठिकाणी हल्ला करायचे, हे निश्चित केले होते.
मॉड्यूल ‘एनआयए’च्या रडारवर
पाकिस्तानातील ‘लष्करे-तैय्यबा’ आणि ‘जैशे-मोहंमद’ या दहशतवादी संघटनांसाठी जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी कंबर कसली आहे. याच्याशी संबंधित मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याप्रकरणी सप्टेंबर महिन्यामध्ये गुन्हा दाखल केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.