koregaon
koregaon 
पुणे

Loksabha 2019 : काेरेगाव भीमा येथे मतदान केंद्रावर सीआरपीएफचा बंदाेबस्त

सकाळवृत्तसेवा

कोरेगाव भीमा : शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना संवेदनशील अशा काेरेगाव भीमा, सणसवाडी मतदान केंद्रावर निवडणुक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसह सीआरपीएफची तुकडी बंदाेबस्तासाठी नेमण्यात आली आहे.

नुकतेच पोलिसांसह सीआरपीएफच्या तुकडीने कोरेगाव सणसवाडीत संचलनही केले. शिरुर लोकसभा मतदार संघात असलेल्या काेरेगाव भीमा व सणसवाडी येथे १ जानेवारी २०१८ ला हिंसाचार झाला हाेता. त्याचे पडसाद राज्यभरात उमटल्यामुळे या ठिकाणी काेणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या वेळी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

याचाच भाग म्हणून काेरेगाव भीमा येथील मतदान केंद्र हे संवेदनशील मतदान केंद्रामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच त्याचे वेब कास्टिंगही करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने घोषित केले आहे. निवडणुकीच्या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जम्मु काश्मिर येथील सीआरपीएफच्या जवानांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ११५ बुथ व ३५ गावांमध्ये सात पोलिस अधिकाऱ्यांसह ७५ होमगार्ड व सीआरपीएफच्या जवानांची एक तुकडी यासह पुरेसा बंदोबस्तासाठी नेमण्यात आला आहे. तसेच कोरेगाव भीमा , सणसवाडी, शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथे पोलिस संचलनही करण्यात आले. तसेच पेट्रोलिंगही सुरू आहे. दरम्यान या बुथवर कोणालाही मोबाईल व तत्सम डिव्हाईस नेता येणार नसल्याचे शिक्रापरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT