ग्राहक जागृतीसाठी सर्वांनी सहभागी व्हावे : विजय शिंदे
पंढरपूर, ता. १९ ः ग्रामीण भागात ग्राहक पंचायतीचे कार्य सुरू झाल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या तक्रारी, प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कायम मदत होणार आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. चांगल्या वैद्यकीय सेवा मिळत नाहीत. ग्राहकांना अडचणी आल्यास काय करायचे, असे प्रश्न नेहमी पडतात. त्यामुळे ग्राहक जागृती करण्यासाठी अशा कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विजय शिंदे यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रविवारी (ता. १५) जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिंदे बोलत होते.
याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास, उपसरपंच नितीन शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. निशा रोकडे, ग्राहक पंचायतीचे तालुका सदस्य शहाजी जाधव, प्रकाश माळी, राम कलढोणे, दीपक शेंडगे, पवन बोधे, हणमंत गायकवाड उपस्थित होते.
विनोद भरते म्हणाले, बाजारपेठेत गेलो की आपण ग्राहक होतो. ग्राहक झाल्यावर सेवा व मालाची खरेदी करतो. ज्यावेळी आपली फसवणूक होते, त्यावेळी ग्राहकांना कुठे तक्रार करायची हे समजत नाही. अशा प्रसंगी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात. त्याकरिता ग्राहकांनी आपले कर्तव्य म्हणून कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर पावती घेणे फार गरजेचे आहे. तरच प्रश्न तात्काळ सोडवता येतो, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना शशिकांत हरिदास यांनी ग्राहक चळवळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संघटनेची स्थापना तसेच ग्राहक संरक्षण कायदा मंजुरीपर्यंतची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदे यांनी केले, तर आभार शशिकांत देशपांडे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.