पुणे

महावितरणचे महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’

CD

बारामती, ता. १३ : वीज ग्राहकांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणच्या बारामती परिमंडलात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ‘ग्राहक समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना प्रलंबित समस्या सोडविण्यास मदत होईल.
सातारा, सोलापूर आणि बारामती ग्रामीण मंडळांतील ५३ उपविभागीय कार्यालयांत सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर पार पडेल. यात वीजबिल दुरुस्ती, सदोष मीटर, नवीन वीजजोडणी आणि वीजपुरवठ्याबाबतच्या तक्रारी ग्राहकांना थेट अधिकाऱ्यांसमोर मांडता येतील.
यावेळी स्मार्ट मीटरची कार्यपद्धती आणि त्याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी विशेष मार्गदर्शनही केले जाणार आहे. ग्राहकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी; चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसा पाठवत असल्याचा संशय

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

SCROLL FOR NEXT