पुणे

व्यसनांपासून दूर राहून करिअरवर लक्ष केंद्रित करा : डॉ. बसवराज शिवपूजे

CD

SGW26B09989
सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे व्याख्यान कार्यक्रमाचे उद्‍घाटन करताना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे व अन्य.

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा ः डॉ. शिवपूजे
फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सांगोला, ता. ११ : मोबाईल, इंटरनेट अन् सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अनोळखी व्यक्तींवर ठेवलेला विश्वास तसेच खात्री न करता दिलेला ओटीपी आर्थिक अन् वैयक्तिक संकटाला आमंत्रण ठरू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबरोबरच ड्रग्ज, धूम्रपान अन् दारूसारख्या व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, कौशल्य अन् करिअरवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांनी केले.

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे ‘सोशल मीडिया अन् सायबर क्राईम’ या विषयावर मंगळवारी (ता. १०) मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. यावेळी सांगोला पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, उपप्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, डॉ. संजय पवार उपस्थित होते.
डॉ. शिवपूजे म्हणाले, अनोळखी लिंक, संदेश किंवा ॲप्लिकेशन वापरताना विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी. मोबाईलवर आलेला ओटीपी कोणालाही देऊ नये. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.’
पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सत्यशील कोळेकर यांनी केले. डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT