Cyber crime sakal
पुणे

Cyber Crime : सायबर चोरट्यांच्या मायाजालापासून सावधान! तक्रारींचे प्रमाण वाढतेय

अनोळखी व्यक्तीकडून मिळणाऱ्या नोकरीला, तसेच कमी व्याजाच्या कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका.

अनिल सावळे

पुणे - अनोळखी व्यक्तीकडून मिळणाऱ्या नोकरीला, तसेच कमी व्याजाच्या कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका. कोणीही ‘ओटीपी’ मागितला किंवा एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितल्यास तेही करू नका; अन्यथा तुमच्या बॅंक खात्यातून पैसे गेलेच म्हणून समजा. अशा प्रकारे शहरात सायबर चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता सायबर गुन्हे शाखेला आणखी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज निर्माण होऊ लागली आहे.

डॉक्टरांना व्हॉट्सॲपवर कॉल आला.....

शहरातील एका नामांकित डॉक्टराच्या व्हॉट्सॲपवर अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. तो कॉल घेताच समोरून कॉल करणारी तरुणी अश्लील इशारे करत होती. ते पाहून त्यांनी व्हिडिओ कॉल बंद केला. काही वेळाने त्या तरुणीने व्हॉट्सॲपवर स्क्रीन शॉट पाठविला. त्यात डॉक्टरचे ‘डीपी’वरील गणवेशातील छायाचित्र आणि तरुणीचे छायाचित्र होते.

अचानक उद्‍भवलेल्या या प्रसंगामुळे डॉक्टरला घाम फुटला. त्या तरुणीने क्यूआर कोड पाठवून पैसे न दिल्यास तो स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरून तरुणीच्या बॅंक खात्यात २१ हजार रुपये ऑनलाइन भरले. तरुणीने पुन्हा पैशांची मागणी केल्याने त्यांनी तो नंबर ब्लॉक केला. परंतु ती पुन्हा दुसऱ्या मोबाईलवरून सातत्याने पैशांची मागणी करत होती. शेवटी डॉक्टरने तक्रार दिली. याबाबत सायबर पोलिसांनी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाइन कर्जात गेले १३ लाख

शहरातील एका ३० वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याची आर्थिक ओढाताण सुरू होती. त्यांनी फेसबुकवर ऑनलाइन कर्जाबाबत ‘कॅश ॲडव्हान्स’ ॲप जाहिरात बघितली. परतफेडीसाठी तीन महिन्यांची मुदत आणि व्याजदरही ०.१ टक्के होता. त्यामुळे त्यांनी ते ॲप डाउनलोड केले.

अर्जात त्यांनी कॅमेरा, मोबाईलमधील संपर्क क्रमांक, लोकेशन, स्टोअरेज अशी माहिती घेण्यास होकार दिला. त्यानंतर आधार, पॅनकार्ड आणि बॅंक खाते क्रमांकाची माहिती दिली. क्षणातच त्यांच्या बॅंक खात्यात दोन हजार २७४ रुपये जमा झाले. त्यानंतर व्याजापोटी अधिकच्या रकमेची मागणी केली. चोरट्यांनी त्यांच्याकडून १३ लाख ८७ हजार रुपये उकळले.

२०२२ या वर्षात ऑनलाइन बँकिंग, एटीएम आणि सायबर फसवणुकीच्या १४ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. २०२३ मधील ही आकडेवारी मुख्य सायबर पोलिस ठाण्यातील आहे. शहरातील इतर ठाण्यांतील आकडेवारी पाहता गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहे.

- मीनल सुपे पाटील, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT