cyber crime update University Grants Commission Twitter account hacked cyber criminals pune  सकाळ डिजिटल टीम
पुणे

सायबर गुन्हेगारांकडून विद्यापीठ अनुदान आयोगाचे ट्‌विटर अकाऊंट हॅक

रविवारी पहाटेच्या सुमारास घडला प्रकार, ट्‌विटरच्या प्रोफाईलला व्यंगचित्र

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशभरातील विद्यापीठांवर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) ट्विटर अकाऊंट रविवारी पहाटे सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सायबर गुन्हेगारांनी त्यावर नियंत्रण मिळविल्यानंतर ट्विटरच्या प्रोफाईलवर व्यंगचित्र वापरुन अनेक अनोळखी व्यक्तींना टॅग करण्यास सुरुवात केल्याचे उघड झाले. मागील काही दिवसात भारतीय हवामान खाते (आयएमडी), उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालय या दोन मोठ्या संस्थांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्याच्या घटना घडल्यानंतर आता युजीसीचेही अकाऊंट हॅक झाल्याची माहिती पुढे आली.

"युजीसी'च्या माध्यमातुन देशातील बहुतांश विद्यापीठांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. त्यामुळे युजीसी देशातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठे नाव आहे. युजीसीचे मुख्य कार्यालय दिल्लीत असून त्यांच्याकडून समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. युजीसीकडून वेबसाईट, ट्विटर अकाऊंटमार्फत विद्यापीठांची अद्ययावत माहिती, अधिनीयम, प्राध्यापक भरती, संशोधन यादी, विविध प्रकारच्या योजना व अन्य उपक्रमांबाबची माहिती सर्वांपर्यंत पोचविली जाते. विशेषतः त्यांच्या @ugc_india या ट्‌विटर अकाऊंटचे सुमारे तीन लाख फालोअर्स आहेत. दरम्यान, रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात सायबर गुन्हेगारांनी संबंधित ट्‌विटर अकाऊंट हॅक केले. त्यानंतर त्यांनी अनेक अनोळखी व्यक्तींना संबंधित अकाऊंटवरुन टॅग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर युजीसीचे अकाऊंट हॅक झाल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, युजीसी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन हा हल्ला थांबविण्यासाठीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, अनोळखी सायबर गुन्हेगारांनी युजीसीचे अकाऊंट हॅक करण्याचा प्रकार केला असल्याचे पुढे आले आहे. या प्रकारामागे नेमके कोण आहे, हे अद्याप पुढे आले नाही. त्यादृष्टीने युजीसीकडून ट्‌विटर अकाऊंटची रिकव्हरी करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच सायबर गुन्हेगारांनी भारतीय हवामान खात्याचे (आयएमडी) ट्‌विटर अकाऊंटही हॅक केले होते. त्याचबरोबर उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री कार्यालयाचेही ट्‌विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता युजीसीचेही अकाऊंट हॅक झाल्याने सायबर हल्ल्याच्या घटनांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT