(इन्फो बॉक्स)
सायबर गुन्हेगारांपासून सावधान...!
-----------
खोट्या शेअर ट्रेडिंगला
कोणीही फसू नका
सोलापूर : समोरच्याने जास्त नफा, मोठी आश्वासने दिली की समजा तेथे फसवणूक पक्की आहे. ‘वा! काही दिवसांत १५ ते २० टक्के नफा, खूप छान संधी, आजच घ्या लाभ’ अशा फसव्या ऑफर सायबर गुन्हेगार देत असतात. काही लिंक सोशल मिडियावर टाकलेल्या असतात.
शेअर मार्केटची आवड असणारे गरजू त्यावर क्लिक करतात आणि लगेच त्यांना टेलिग्रामच्या एका ग्रूपमध्ये समाविष्ठ करून घेतले जाते. त्याठिकाणी काहीजण मला आठ दिवसांत, १५ दिवसांत एवढा नफा झाला, अजून कोणती स्किम आहे का, अशी विचारणा करतात. त्यावेळी, त्या चर्चेवर विश्वास ठेवून आपल्यालाही मोह होतो आणि आपण पैसे गुंतवायला सुरवात करतो. सुरवातीला एक-दोन वेळा परतावा दिला जातो. आपल्याला खात्री पटावी म्हणून त्याचे हे कारस्थान असते. त्यानंतर आपण मोठी रक्कम गुंतवतो आणि आपल्याला किती परतावा मिळाला हे आभासी पद्धतीने ऑनलाइन दिसते. काही वेळाने ते पैसे काढायचे म्हटल्यावर टॅक्स भरायला सांगतात. त्यावेळी ना मुद्दल परत मिळते ना नफा मिळतो. त्यामुळे नागरिकांनी सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन सोलापूर शहर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.