India's Selection Committee: टीम इंडियाच्या निवड समितीत रमेश पोवार यांना मिळाली आगरकरांची जागा, पण तरी अध्यक्ष मात्र वेगळाच!

भारतीय संघाच्या निवड समितीत नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. अजित आगरकरांची रिक्त झालेली जागा भरण्यात आली असून नव्या अध्यक्षाची घोषणा केली आहे.
Ramesh Powar Joins BCCI Committee

Ramesh Powar Joins BCCI Committee

Sakal

Updated on: 

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीत अखेर नव्या सदस्याचा प्रवेश झाला आहे. ४ ऑक्टोबर रोजी अजित आगरकर (Ajit Agarkar) यांचा भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्याची निवड समितीतील पश्चिम विभागाचे प्रतिनिधी म्हणून जागा रिकामी झाली होती. ही रिक्त जागा भरण्यासाठी योग्य उमेदवाराचा बीसीसीआय शोध घेत होते, त्यासाठी त्यांनी अर्जही मागवले होते.

अखेर बीसीसीआयला या जागेसाठी योग्य प्रतिनिधी मिळाला आहे. मुलाखतीनंतर बीसीसीआयने रमेश पोवार यांनी निवड समितीत नियुक्त केले आहे. याशिवाय नवा निवड समिती अध्यक्ष म्हणून प्रज्ञान ओझाची घोषणा करण्यात आली आहे. तो अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून अंतरिम अध्यक्ष म्हणून काम करत होता.

Ramesh Powar Joins BCCI Committee
India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com