पुणे

सायबर फसवणूक प्रकरणी एका आरोपीला अटक

CD

सायबर फसवणूकप्रकरणी
एका संशयितास अटक

वडूज, ता. ५ ः सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका संशयिताला दहिवडी पोलिसांनी अटक केली. त्याला दहिवडी न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, सातारा सायबर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश प्रकाश माळी (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. तपासामध्ये पोलिसांनी तौहिद बाळू आतार (वय ३१, रा. दहिगाव रोड, नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला सोमवारी (ता. तीन) रात्री साडेअकरा वाजता अटक केली.
तपासात संशयिताने खादीजा एंटरप्रायझेस या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र, हिंगणगापूर शाखेत चालू खाते उघडले होते. एनसीसीआरपी पोर्टलवरून मिळालेल्या माहितीवरून संशयिताने सायबर फसवणुकीद्वारे एक लाख ११ हजार ६५३ रुपये या खात्यात वर्ग करून घेतले होते.
देशभरातील एकूण २० लोकांनी या सायबर गुन्ह्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दहिवडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
पोलिसांनी संशयिताकडून एक लाख रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला आहे. वडूजचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी लवकरच त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जाईल, असे सांगितले.

-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT