उरुळी कांचन, ता. २७ : घरगुती गॅसचे बिल थकल्याचे सांगून किंवा कनेक्शन कापण्याची भीती दाखवून ''एमएनजीएल'' ग्राहकांची सायबर फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. बोगस ॲप्स, बनावट कस्टमर केअर नंबर आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून ग्राहकांच्या बँक खात्यांवर रक्कम लंपास केल्याने चिंता व्यक्त होत आहे.
पुण्यासह महाराष्ट्रातील शहरी भागात एमएनजीएलच्या नावाने बनावट एसएमएस आणि व्हॉट्सॲप संदेश पाठवले जात आहेत. ''तुमचे बिल अपडेट नसल्यामुळे आज रात्री गॅस पुरवठा खंडित होईल,'' असा संदेश पाठवून ग्राहकांना एका लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त केले जाते. ही लिंक प्रत्यक्षात मालवेअर किंवा स्क्रीन-शेअरिंग ॲप असते, ज्याद्वारे सायबर चोर ग्राहकांच्या मोबाईलचा ताबा मिळवतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्याकडून ओटीपी मिळवला जातो आणि काही मिनिटांतच त्यांच्या खात्यातील रक्कम लंपास केली जाते.
सायबर चोर स्वतःला एमएनजीएलचे अधिकारी भासवून ग्राहकांना तातडीने पेमेंट करण्यास भाग पाडतात. अधिकृत ॲपऐवजी चोरट्यांनी पाठवलेल्या लिंकवरून व्यवहार केल्यास फसवणूक होत आहे. या प्रकारांमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कंपनीने आपली सुरक्षा यंत्रणा आणि तक्रार निवारण केंद्र अधिक सक्षम करण्याची मागणी तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.
ग्राहकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा कोणालाही ओटीपी शेअर करू नये. तसेच तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास सुविधा वाढतात; परंतु निष्काळजीपणा केल्यास त्याच तंत्रज्ञानामुळे मोठे नुकसान होऊ शकते .
- प्रा. योगेश हांडगे, विषयतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.