पुणे, ता. २४ ः विमा कंपनीतून बोलत आहे. तुमचा विमा बंद झाला असून त्याचे पैसे मिळवून देतो, अशी बतावणी करत सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल १७ लाख १२ हजारांचा ऑनलाइन गंडा घातला. ही घटना फेब्रुवारी २०२४ ते २५ ऑगस्ट २०२५ दरम्यान पाषाण परिसरात घडली.
या प्रकरणी ४८ वर्षीय व्यक्तीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोबाईलधारक, बँकखातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पाषाण रस्ता परिसरात राहायला असून, फेब्रुवारी २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क साधला. विमा कंपनीच्या सेटलमेंट विभागातून बोलत असल्याची बतावणी करत त्यांच्या बंद झालेल्या पॉलिसीचे पैसे मिळवून देणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित करून तब्बल १७ लाख १२ हजार रुपये ऑनलाइन वर्ग करण्यास भाग पाडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.