cybercrime
cybercrime 
पुणे

ऑनलाइन फसवणूक झालेल्या व्यक्तींचे 17लाख रुपये परत 

सकाळवृत्तसेवा

पुणे - ऑनलाइन बॅंकिंग, डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करताना नागरिकांच्या बॅंक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेण्यात आली होती. याबाबतच्या तक्रारींची दखल घेत सायबर पोलिसांनी बॅंका, वित्तीय संस्थांकडे पाठपुरावा करून 17 लाख 26 हजार रुपयांची रक्कम तक्रारदारांना परत मिळवून दिली. 

संचारबंदी सुरू असताना एक ते पाच एप्रिल या कालावधीमध्ये घडलेल्या घटनांमधील तक्रारदरांना सायबर पोलिसांनी दिलासा दिला आहे. नागरिकांकडून विविध प्रकारचे ऑनलाइन व्यवहार केले जातात. मात्र, कोणत्याही प्रकारचा व्यवहार केलेला नसतानाही आणि ऑनलाइन बॅंकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डचे ओटीपी कोणालाही दिला नसतानाही तक्रारदारांच्या बॅंक खात्यातील रक्‍कम काढून घेण्यात आली होती.

याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होता. त्यानंतर पोलिसांनी संबंधित बॅंकांशी पाठपुरावा करून तक्रारदारांना ऑनलाइन माध्यमातून गेलेली रक्कम परत मिळवून दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT