पुणे

गुणवाढप्रकरणी मूल्यांकन अधिकारी अटकेत;  सायबर पोलिसांची कारवाई

सकाळवृत्तसेवा

पुणे - पैसे घेऊन 178 विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याप्रकरणी शहरातील एका नामांकित अभिमत विद्यापीठातील मूल्यांकन अधिकाऱ्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी त्यास 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मूल्यांकन अधिकारी संदीप रामकृष्ण हेंगळे (वय 49, रा. गुलमोहोर अपार्टमेंट, नवश्‍या मारुती मंदिराजवळ, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सुमीत कुमार (रा. अंबरपेठ, हैदराबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. संबंधित विद्यापीठातील प्रमुख मूल्यांकन अधिकारी नामदेव कुंभार (रा. मॉडेल कॉलनी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हेंगळे याला सायबर पोलिसांनी अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले होते. हेंगळे, कुमार हे विद्यापीठात मूल्यांकन अधिकारी आहेत. दोघांनी 178 विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले. संगणकीय प्रणालीचा गैरवापर करून गुणवाढ दिली, असे सरकारी वकील ऍड. ज्ञानेश्वर मोरे यांनी युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रकरणात तांत्रिक तपासाच्या अनुषंगाने हेंगळे याच्याकडून संगणक, हार्ड डिस्क, मोबाईल संच, पेन ड्राईव्ह असे साहित्य जप्त करायचे आहे. गुन्हा करण्यासाठी त्याने आणखी काहीजणांची मदत घेतल्याचा संशय आहे. हेंगळे आणि कुमार यांच्या बरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. गुणवाढ देण्यात आलेले विद्यार्थी, हेंगळे, कुमार यांच्या कसे संपर्कात आले. विद्यार्थ्यांनी त्यांना पैसे कसे दिले. याबाबतचा तपास करायचा असल्याने आरोपीला सात दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती ऍड. मोरे यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने हेंगळे याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Asian Games,Cricket: भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा मेडल पक्के! बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक

Mohol Ganesh Mandal Youth Death : गणेश मंडळात चक्कर येऊन 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळला अन्..., कार्यकर्त्यांमध्ये हळहळ

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : 'यूपीआय'वरील शुल्काचा पुनर्विचार करा; ग्राहक पंचायतची मागणी

SCROLL FOR NEXT