पुणे

सायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे 

सकाळवृत्तसेवा

पुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर केला आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, बीआरटीचे थांबे आणि मेट्रोची नियोजित स्थानके यांना सायकल ट्रॅकने जोडले जाणार आहे. त्यात तीन प्रकारचे सायकल ट्रॅक निर्माण होणार आहेत. 

एकेकाळी सायकलींचे शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पुण्यात 1980 पर्यंत सायकल वापरण्याचे प्रमाण 27 टक्के होते. परंतु, 2017 पर्यंत हे प्रमाण 3 टक्‍क्‍यांपर्यंत खाली घसरले. खासगी वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे सायकल वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचबरोबर सायकलस्वारांना रस्त्यावर असुरक्षित वाटत असल्यामुळे त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने आयट्रान्स, सेंटर फॉर एन्व्हार्यमेंट एज्युकेशनच्या संस्कृती मेनन, आर्किटेक्‍ट अर्बन डिझायनर प्रसन्न देसाई आणि "परिसर'चे रणजित गाडगीळ यांच्या सहकार्याने पहिल्यांदाच सायकल ट्रॅक आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता तो केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे. 

शहरात उभारण्यात येणारे सायकल ट्रॅक सुमारे तीन मीटर रुंदीचे असतील. शहरात सायकल ट्रॅकचे जाळे निर्माण करण्यासाठी सुमारे 335 कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्र सरकारचा निधी उपलब्ध झाला नाही, तर अर्थसंकल्पात तरतूद करून दर वर्षी सुमारे 75 किलोमीटरचे सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

असे साकारणार सायकल ट्रॅक 
- स्वतंत्र सायकल ट्रॅक - 531 किलोमीटर 
- रस्त्यावर रंगवलेले ट्रॅक - 154 किलोमीटर 
- कालव्यालगतचे स्वतंत्र ट्रॅक - 74 किलोमीटर 
- दुरुस्ती करावे लागणारे ट्रॅक - 54 किलोमीटर 

सायकल ट्रॅकवर अतिक्रमणे 
शहरात या पूर्वी 180 किलोमीटरचे सायकल ट्रॅक झाले आहेत. त्यातील 92 किलोमीटरचे सायकल ट्रॅक अस्तित्वात आहेत, तर 54 किलोमीटरच्या ट्रॅकमध्ये सलगता नाही. याचबरोबर 36 किलोमीटरचे ट्रॅक नावापुरते आहेत. अस्तित्वात असलेल्या सायकल ट्रॅकवर अनेक ठिकाणी दूरध्वनीचे बॉक्‍स, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर्स, पथारीवाले, बस थांबे आदींची अतिक्रमणे असल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची", शक्तिपीठ महामार्गाविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर

PoK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तरंजित संघर्ष! निदर्शकांवर गोळीबार, १२० जण ठार झाल्याचा दावा; तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

FIFA World Cup 2026 full Schedule: ४८ संघ, ३९ दिवस अन् १०४ सामन्यांचा थरार रंगणार..! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या सर्वकाही

Dharavi Redevelopment: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं प्रकल्प कधी पूर्ण होणार?

राज्यसभेच्या २६ जागांसाठी २८ उमेदवार मैदानात, भाजपनं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; दोन-तृतियांश बहुमतासाठी NDAच्या हालचाली

SCROLL FOR NEXT