पुणे

बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळ

CD

बंगालच्या उपसागरात
‘अक्वान’ चक्रीवादळ

शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा

पुणे : बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरात वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. सोमवारी (ता. १६) सायंकाळनंतर या भागात ‘अक्वान’ तीव्र चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी (ता. २०) आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उपसागरातील वादळी प्रणालीचे (डीप डिप्रेशन) केंद्र गेल्या तासाला सहा किलोमीटर वेगाने वायव्य दिशेकडे सरकत आहे. सोमवारी (ता. १६) दुपारी या वादळी प्रणालीचे केंद्र श्रीलंकेतील त्रिंकोमलीपासून ६३० किलोमीटर ईशान्येकडे, तमिळनाडूतील चेन्नईपासून ७०० किलोमीटर आग्नेयेकडे, तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून ८०० किलोमीटर आग्नेयेकडे होते.
सोमवारी (ता. १६) सायंकाळनंतर दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. आज (ता. १७) पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याचे संकेत आहेत.
शुक्रवारी (ता. २०) दुपारपर्यंत अति तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टीवर नेल्लोर आणि तुनीदरम्यान किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीला धडकताना वाऱ्याचा वेग ताशी १२० ते १३० किलोमीटर राहणार असून, ताशी सुमारे १४५ किलोमीटर वेगाने वाऱ्याचे झोत येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

फोटो आहे. (agncyclone)
फोटो ओळ - बंगालच्या उपसागरातील संभाव्य ‘अक्वान’ तीव्र चक्रीवादळाची वाटचाल दर्शविणारा नकाशा. (सौजन्य : हवामान विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

MPSC Scam: आयोगाचे दोन सदस्य चौकशी समितीच्या रडार वर? तुकाराम मुंढे काय कारवाई करणार?

राज ठाकरेंची मोठी खेळी! बड्या नेत्यांसह ३५० कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश, एकनाथ शिंदेंसह छावा संघटनेला धक्का

Latest Marathi News Update : मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ला प्रकरणातील ३ आरोपींना जामीन मंजूर

Kulgam Encounter: कुलगाम हल्ल्याचा बदला! लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर लतीफ भटसह दोन दहशतवादी ठार; जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT