Pune-Zp 
पुणे

चक्रीवादळाचा शाळा, अंगणवाड्यांना बसला फटका ; दुरुस्तीसाठी झेडपी करणार 'एवढा' खर्च

सकाळवृत्तसेवा

पुणे - निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत मुख्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि स्मशानभूमी शेडच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी ५७ लाख ८६ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबतच्या दुरुस्ती प्रस्तावांना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तांत्रिक मंजुरी दिली आहे. यासाठी आता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे निधी मागणी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्यावतीने नुकसान झालेल्या शाळा, अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठीचे अंदाजपत्रक (एस्टिमेट) तयार करण्यासाठी दोन दिवस विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत बांधकाम विभागातील सर्व शाखा अभियंते, कनिष्ठ अभियंत्यांवर तालुकानिहाय जबाबदारी सोपविण्यात आली होती. दोन दिवसांच्या मोहिमेनंतर लगेचच या प्रस्तावांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.

या तांत्रिक मान्यतेनंतर आता या प्रस्तावांना बांधकाम समितीची मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर जिल्ह्याला नुकसान भरपाईसाठी मिळालेल्या खास पॅकेजमधून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी राम यांच्याकडे केली जाणार आहे.

या चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील ३१६ प्राथमिक शाळा, १५७ अंगणवाड्या, १५ ग्रामपंचायती, १४ प्राथमिक आरोग्य केंद्र, एक पशुवैद्यकीय दवाखाना आणि  २२ स्मशानभूमी शेडचे नुकसान झाले आहे. दोन जूनला हे चक्रीवादळ आले होते.

संस्थानिहाय दुरुस्ती खर्च (रुपयांत) 
- प्राथमिक शाळा --- ८ कोटी ९ लाख.
- अंगणवाडी --- १ कोटी ६८ लाख ६४ हजार.
- ग्रामपंचायत मुख्यालय --- ५१ लाख ८ हजार.
- आरोग्य केंद्र --- ६० लाख ६४ हजार.
- पशूवैद्यकीय दवाखाना ---- सहा लाख.
- स्मशानभूमी शेड ---- ६२ लाख ५० हजार.
- एकूण ---- ११ कोटी ५७ लाख ८६ हजार.

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सर्व जिल्हा परिषदेच्या अख्त्यारितील इमारतींच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय खासगी मालकीची घरे, अन्य इमारती यांच्याही  नुकसानीचे पंचनामे केले आहेत.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Latest Marathi News Live Update : विद्युत शॉक लागून होतकरू तरुणाचा मृत्यू; खानापुरातील घटना

Property Card Maharashtra : महापालिका क्षेत्रातील 7/12 उतारे बंद; मिळकतपत्रिका देण्याचा निर्णय, शहरातील जमिनींसाठी 'प्रॉपर्टी कार्ड' व्यवस्था लागू

चीनने पाठ फिरवली, तेव्हा भारताने वाचवले प्राण; आफ्रिकेत भारतीय औषधांचा डंका आणि 'आरोग्यदूत' प्रतिमा!

SCROLL FOR NEXT