पुणे

पुढील दोन दिवस पावसाची शक्यता तापमानात आठ अंशांची घट ः पुण्यासाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर

CD

पुणे, ता. २ : बंगालच्या उपसागरातील तीव्र चक्रीवादळ ‘मुरासू’ आणि अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे पुणे शहर आणि परिसरात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्रीपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे कमाल तापमानात एकाच दिवशी आठ अंश सेल्सिअसने घट झाली. सोमवारी (ता. २) सकाळीही शहराच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
शहर आणि परिसरात रविवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सोमवारी सकाळी आणि दुपारीदेखील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या २४ तासांत शहरात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. शिवाजीनगर परिसरात सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १० मिलिमीटर पाऊस पडला. सोमवारी शहरात कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तापमानातील मोठी घट आणि दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा मिळाला. मंगळवारी (ता. ३) कमाल तापमान २६ अंश, तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊन नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळील चक्रीवादळाची वाटचाल आणि वातावरणातील इतर घटकांमुळे राज्यातील हवामानात बदल झाला आहे. या प्रणालीचा प्रभाव पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जाणवत आहे. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. चक्रीवादळाची पुढील दिशा आणि महाराष्ट्रावरील त्याचा प्रभाव आगामी दोन ते तीन दिवसांत स्पष्ट होणार आहे.
याविषयी भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (पुणे) वैज्ञानिक डी. डॉ. एस. डी. सानप म्हणाले, ‘‘सध्याच्या हवामान बदलामागे वातावरणातील वाढलेली आर्द्रता आणि सबट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीमची बदललेली स्थिती हे प्रमुख घटक आहेत. सर्वसाधारणपणे १० ते १२ किलोमीटर उंचीवरून वाहणारी ही जेट स्ट्रीम सध्या सुमारे पाच किलोमीटर उंचीवर सक्रिय झाली आहे. ती दक्षिण-दक्षिणपूर्व दिशेकडे सरकल्याने थंड आणि दमट वारे वाहत आहेत. त्यामुळे ढगनिर्मितीस पोषक वातावरण तयार होऊन राज्यातील काही भागांत पाऊस पडत आहे.’’
-------------
यंदा कडाक्याची थंडी कमी
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे हिवाळ्यातील थंडीची तीव्रता काहीशी कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे हिवाळा नाहीसा होणार नाही. काही दिवस तापमानात घट होऊन थंडी वाढेल, तर काही दिवस तापमानात किंचित वाढ होईल. पावसाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही थंडीचे वेगवेगळे टप्पे अनुभवायला मिळतात. त्यामुळे यंदा कडाक्याच्या थंडीचे प्रमाण तुलनेने कमी असले, तरी डिसेंबरपर्यंत थंडीचे विविध टप्पे अनुभवायला मिळतील, असे डॉ. सानप यांनी सांगितले.
-----------------
‘‘पुढील दोन ते तीन दिवस चक्रीवादळाची वाटचाल आणि त्याचा प्रभाव याबाबत महत्त्वाचे ठरणार आहेत. चार नोव्हेंबरपर्यंत त्याची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, पाच नोव्हेंबरनंतर राज्यात पावसाची शक्यता कमी होईल. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही पावसाची शक्यता नाही. सध्याचे ढगाळ वातावरण दूर झाल्यानंतर आकाश निरभ्र होईल. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन थंडी जाणवू लागेल.’’
- डॉ. एस. डी. सानप, वैज्ञानिक डी., भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे
-------------
सोमवारी सायंकाळी सहापर्यंत पावसाचे प्रमाण
ठिकाण - पाऊस (मिलिमीटर)
तळेगाव ढमढेरे - ४३.०
मगरपट्टा - १६.०
हवेली - १३.०
चिंचवड - ११.५
शिवाजीनगर - १०.९
शिरूर - ७.०
बारामती - ४.६

---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rising Stars Asia Cup साठी भारतीय संघाची घोषणा! तिलक वर्मा कर्णधार, तर अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशचाही समावेश

Narendra Modi: जागतिक ऊर्जा संकटाचा भारतावर प्रभाव का पडला नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Pune Road Accident: शिरूरमध्ये भीषण अपघात! अष्टविनायक महामार्गावर मोटारीच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू; ओव्हरटेकचा प्रयत्न ठरला जीवघेणा

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची उद्या महत्त्वाची बैठक; राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार बैठक, सुनील तटकरेंची माहिती

Life Abroad: भारतात घर घेणे अवघड असलेल्यांना विदेशात व्हिला अन् महागड्या गाड्या कशा घेता येतात?

SCROLL FOR NEXT