PNE26W59701
अहिल्यानगर ः अहिल्यानगर येथील इतिहासप्रेमी मंडळाचे सदस्य असलेल्या कामिल पारखे, अविनाश वाघ, भैरवनाथ वाकळे, आसिफ खान दुलेखान, संध्या मेढे यांनी सिंथिया फरारबाईंची ही दगडी समाधी शोधून काढली.
सावित्रीबाईंच्या शिक्षिका सिंथिया यांच्या समाधीचा शोध
अहिल्यानगर इतिहासप्रेमी मंडळाच्या सदस्यांना यश
अहिल्यानगर, ता.१७ ः महात्मा जोतिबा फुले यांना स्त्रीशिक्षण कार्याची प्रेरणा देणाऱ्या आणि सावित्रीबाई फुले यांना अहिल्यानगर येथे अध्यापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या सिंथिया फरारबाईंच्या अहिल्यानगर येथील समाधीचा अखेर शुक्रवारी (ता.१६) शोध लागला आहे.
अहिल्यानगर येथील इतिहासप्रेमी मंडळाचे सदस्य असलेल्या अविनाश एकनाथ वाघ, भैरवनाथ वाकळे आणि आसिफ खान दुलेखान यांनी सिंथिया फरारबाईंची ही दगडी समाधी शोधून काढली. गेली जवळजवळ पाऊणेदोनशे वर्षे ही समाधी अज्ञात आणि त्यामुळे दुर्लक्षित होती. या संशोधकांनी ही समाधी सफाई करून त्यावर फुले वाहून सावित्रीबाईंच्या या शिक्षिकेला आदरांजली वाहिली. महात्मा फुले यांची यावर्षी द्विजयंती शताब्दी वर्षात फरारबाईंच्या चिरविश्रांतीच्या जागेचा शोध लागला. याबद्दल इतिहासप्रेमी मंडळाने आनंद व्यक्त केला आहे. अहिल्यानगर येथील बुऱ्हाणनगर परिसरात सेंट झेव्हियर्स कब्रस्थानातली फरारबाईंची ही कबर आजही चांगल्या स्थितीत आहे.
या सेंट झेव्हियर्स दफनभूमीत सिंथिया फरारबाईंची दगडी कबर असून या समाधीवरील या अमेरिकन मिशनरीचे `सिंथिया फरार'' हे कोरलेले नाव अगदी स्पष्टपणे दिसते. त्यामुळे फरारबाईंचीच ही समाधी आहे, याविषयी काही शंका राहत नाही, असे भैरवनाथ वाकळे यांनी म्हटले आहे. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रात जोतिबांनी आपले मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्याबरोबर अहिल्यानगरला सिंथिया फरार यांच्या मुलींच्या शाळेला भेट दिली, या घटनेवर सविस्तर उल्लेख आहे.
---------
सिंथिया फरार यांच्या मुलींच्या शाळेला भेट दिल्यानंतर जोतिबा खूप प्रभावित झाले. त्यांनी नंतर पुण्यात मुलींच्या शाळा सुरू केल्या, असे खुद्द जोतिबांनी लिहिले आहे.
- कामिल पारखे, सिंथिया फरार यांचे चरित्रकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.